गिरवी:-(फलटण)-प्राचीन काळापासून आध्यात्मिक धार्मिक परंपरा जोपासणारे गिरवी गाव: श्रीमती शारदादेवी कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
प्राचीन काळापासून आध्यात्मिक धार्मिक परंपरा जोपासणारे गिरवी गाव: श्रीमती शारदादेवी कदम.
गिरवी ( फलटण):- सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील प्राचीन काळापासून गौरवशाली परंपरा असलेले गिरवी गावात आई तुळजाभवानी मंदिर, भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर,सतीआई मंदिर,मरीमाता मंदिर, गणपती मंदिर,विठ्ठल रखुमाई मंदिर, गोपाळकृष्ण मंदिर, शंभु महादेव मंदिर,जानुबाई मंदिर,श्री प्रभु श्रीराम मंदिर, गुरुदेव दत्त मंदिर,राजेखान मंदिर,बाळानगारजी,सटवाई मंदिर अशा पंधरा मंदिरात देवदेवतांची पूजा, अभिषेक,आरती भाविक भक्त मंडळी नित्यनेमाने करतात.गिरवी गावाला आध्यात्मिक धार्मिक सेवेचा प्रदिर्घ काळापासून वारसा चालवत आलेला आहे.असे विचार श्रीमती शारदादेवी कदम (संस्थापक सचिव जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी व माजी सभापती महिला बालकल्याण समिती सातारा जिल्हा परिषद सातारा) यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक आध्यात्मिक सेवा कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी मधील विद्यार्थ्यांनी प्राचार्य संजयकुमार सावंत व शाळेतील शिक्षक, शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट उल्लेखनीय अशी वारकरी संप्रदायातील वेशभूषेत विविध आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.त्याचे गावातील पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार, ग्रामस्थांनी कौतुक केले.अनेक दानशूर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना उपवासाचे पदार्थ, राजगिरा लाडू खाऊ दिला.
गिरवी गावातील भजनी मंडळाने टाळ चिपळ्यांचा मृदंगाच्या सोबत हरीनामाचा गजर करीत वाजतगाजत पालखी सोहळा ग्रामप्रदिक्षणा करत सर्व देवदेवतांची पूजा आरती करत मार्गस्थ झाला.
आषाढी एकादशी निमित्त गिरवी गावात विठ्ठल रखुमाई व गोपाळकृष्ण यांच्या पालखी सोहळ्यातील पालखी प्रदक्षिणा,भजन, दिंडी पताकांच्या पालख्यांची टाळ मृदंगाच्या सोबत वाजतगाजत मिरवणूक काढून ग्रामप्रदिक्षणा करत विविध आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रसंगी गोपाळकृष्ण मंदिरात श्रीमती शारदादेवी कदम यांचा गोपाळकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अरविंद देशपांडे यांचे शुभहस्ते यथोचित सत्कार संपन्न झाला.
गोपाळकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे पुजारी,गिरवी गावातील ग्रामपंचायतींचे माजी सदस्य संभाजीराव कदम, प्रकाशराव कदम,गिरवी गावचे जेष्ठ नागरिक विश्वासराव कदम, रामभाऊ कदम (मुकादम),एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम भाविक, महिला, आबालवृद्ध उपस्थित होते.