श्रीरामपूर:-माळेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यातय व अंकुर महिला ग्रामसंघ, वोतकार्ट फाउंडेशन तर्फे भव्य मोफत स्त्रीरोग जनजागृती शिबीर.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपूर:-माळेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यातय व अंकुर महिला ग्रामसंघ, वोतकार्ट फाउंडेशन तर्फे भव्य मोफत स्त्रीरोग जनजागृती शिबीर.
श्रीरामपूर प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय माळेवाडी व अंकुर महिला ग्रामसंघ तसेच वोलकार्ट फाउंडेशन मुंबई आणि डॉ माने मेडिकल फाउंडेशन संचलित साईधाम हॉस्पिटल राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत स्रीरोग गर्भमुख कॅन्सर तपासणी, कॅन्सर स्रीरोग जनजागृती शिबीर संपन्न झाले.
यावेळी डॉ मेडिकल फाउंडेशन चे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे यांनी फाउंडेशन च्या विविध प्रकल्पा विषयांवर माहिती देत महिलांनी न लाजता न संकोच बाळगता स्रीरोग गर्भमुख कॅन्सर तपासणीसाठी पुढे आले पाहिजे
ग्रामीण भागात कॅन्सर स्रीरोग या आजाराविषयी जनजागृती नसल्यामुळे कॅन्सर आजार वाढत चाललाय तसेच ग्रामीण भागात स्रीरोग व कॅन्सर तज्ञ नसल्याने ग्रामीणभागातील महिला
सातत्याने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत कुटुंबाला व कामाला प्राधान्य देत तिचि जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असते अशा विविध कारणाने ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्षित पणामुळे कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडतात.
यावेळी माळेवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सोपानराव औताडे, लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई औताडे, महिला बचत गटाच्या प्रभाग समन्वयक
CPC सुरेखा घोडके,CRP दुर्गा औताडे, डॉ वैशाली बल्लाळ,आशासेविका अर्चना मोहन,सुशिला काळे तेजस झिंजुर्डे, अनिकेत धनेधर,महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.