सातारा:-नागठाणे येथे जेष्ठ नागरिकानी आषाढी एकादशी केली उत्साहात साजरी.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
नागठाणे येथे जेष्ठ नागरिकानी आषाढी एकादशी केली उत्साहात साजरी.
सातारा :- नागठाणे गावातील अष्टविनायक जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री.विश्वास भोसले आणि सहकारी यांच्या वतीने आषाढी एकादशीचे अवचित्त साधून त्यांनी मोठया भक्तीभावाने मोठया उत्साहात टाळ मुर्दूगाच्या वाद्यात भगवंताच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या विठ्ठलाचे नामस्मरण केले. जेष्ठनागरिकां च्या मनात पांडुरंगाच्या भेटीला माऊलीच्या पारंपरिक दिंडीत (वारीत )पायी जाण्याची इच्छा असतानाहि ते शरीर प्रकुर्ती ने जाऊ शकत नाही म्हणून ते पांडुरंगला बोलत आहेत हे पांडुरंगा शरीराने जरी गावी असलो तरी मनाने आम्ही सर्व पंढरपूरात तुमचे दर्शन घेत आहोत.नागठाणे गावची सुकन्या गायक कु.भक्ती चंद्रकांत साळुंखे हिने भक्ती(भजन ) संगीत गाऊन तर कु.पृथ्वी चंद्रकांत साळुंखे यांनी संगीत रुपी स्वर देऊन भगवंताच्या नामचा गजर केला व त्या भगवंताच्या गजराला सर्व जेष्ठ नागरिकांची साथ लाभली तसेच जेष्ठ नागरिकांनी बाळ भक्ततांनचे शालश्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच बाळा साहेब रघुनाथ साळुंखे यांनी आषाढी एकादशीची माहिती सांगून उपवास अल्प आहारा नंतर दिंडीची सांगता करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष श्री. विश्वास भोसले. उपाध्यक्ष सुभेदार श्री. रामचंद्र नलवडे सचिव श्री. मधुकर खुळे व जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता नागठाणे नगरितील विठ्ठल रुख्मिणी मंदिरापर्यत पायी दिंडीचे नियोजन करून टाळ मुर्दूगाच्या जयघोष करून पांडुरंगाचे दर्शन घेऊन दिंडीचा आनंद घेतला.