चोराडे:-(पुसेसावळी)-राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल पुसेसावळी यांची चोराडे गावातील विद्यार्थी आषाढी दिंडी उत्साहात साजरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल पुसेसावळी यांची चोराडे गावातील विद्यार्थी आषाढी दिंडी उत्साहात साजरी.
चोराडे :- राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल पुसेसावळी च्या विद्यार्थ्यांनी चोराडे ता. खटाव जि. सातारा येथे विद्यार्थी आषाढी दिंडी शनिवार दिनांक 05.07.2025 रोजी आयोजित केली होती. यावेळी चोराडे गावातील महिलांनी पालखीचे दर्शन साठी उत्साह दाखवला.
तसेच विद्यार्थ्यांनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, ग्यानबा तुकाराम असा जयघोष करून परिसर दुमदुमला होता.
तसेच विद्यार्थ्यांनी रिंगण, विविध गीतावर नृत्य सादर केली. नागरिकांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी चोराडे गावातील श्री.सुहास बाबुराव पिसाळ जिल्हा परिषद गट युवा नेते,श्री.सुधाकर शंकर कुंभार उपसरपंच ग्रामपंचायत चोराडे, श्री.संजय रामचंद्र मदने माजी सरपंच ग्रामपंचायत चोराडे, वसंत परसू मोकाशी जेष्ठ नागरिक, आबासाहेब यशवंत काशीद, सुहास धोंडीराम पिसाळ पैलवान चोराडे व सागर बाळकृष्ण हिम्मत पालक समिती सदस्य उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांना खाऊवाटप पत्रकार प्रमोद देवाडिगा यांनी केला.
वरील कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.हणमंत ठोंबरे सर, सुपरवायझर सौ. कविता भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता देशमुख, वंदना कदम व आभार कु. नागेश्वरी पवार यांनी मानले.