खटाव:-मायणी येथे बालचमुची पायी दिंडी.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मायणी येथे बालचमुची पायी दिंडी.
मायणी प्रतिनिधी—खटाव तालुक्यातील मायणी येथून अनेक अनेक पायी दिंड्या पंढरपूरला जातात त्यामुळे मैने परिसरात भक्तीमय वातावरण तयार होते येथील स्फूर्ती शिक्षण मंडळ संचलित अनंत इंग्लिश स्कूल व हुतात्मा भगतसिंग प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी खांद्यावर पताका, हातात टाळ, व विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा घेऊन ज्ञानेश्वर माऊली तुकाराम च्या जयघोषात दिंडी काढली दिंडी शाळेपासून निघून जिथून यशवंत बाबाची पालखी पंढरीला जाते त्या यशवंत बाबाच्या मंदिरापर्यंत पायी चालत दिंडी काढली या दिंडीमध्ये स्फूर्ती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव येळगावकर, त्यांच्या सुविध्य पत्नी डॉक्टर सौ उर्मिला येळगावकर, मुख्याध्यापक दीपक खलीपे, दुसरे मुख्याध्यापक सुनील यलमर, तसेच शिक्षक, महिला शिक्षक, अन्य कर्मचारी, यांनी भाग घेतला या दिंडीमुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.