मुंबई:-मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मुस्लिम नेत्यांची आत्मचिंतन बैठक…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मुस्लिम नेत्यांची आत्मचिंतन बैठक…
मुंबई दि: स्वातंत्र्य लढ्यापासून भारत देशाच्या प्रगतीमध्ये खारीचा वाटा उचलणारे अनेक मुस्लिम बांधव आहेत. त्यांचे खूप योगदान मोठे आहे परंतु अलीकडे राजकीय अस्पृश्यता म्हणून मुस्लिमांकडे पाहिले जाते. अशी खंत व्यक्त करून मुस्लिम नेत्यांची आत्मचिंतन बैठक होऊ लागलेली आहे.
मुस्लिम मायनॉरिटी ही राजकीय अनाथ असल्यासारखी अवस्था झाली आहे. पी एम एम एन एफ या संस्थेच्या बैठकीत अधोरेखित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये मागील तीन वर्षामध्ये निरपराधी मुस्लिम समाजावर धार्मिक द्वेष पसरवून हल्ले केले जात आहे. व्यवसायिक दृष्टिकोनातून बहिष्कार घातला जात आहे. त्यामुळे संविधान धोक्यात आलेले आहे. सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते सादिकभाई शेख यांनी आत्मचिंतन बैठकीत अनुभवातून चांगले मुद्दा मांडले.
संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात सुद्धा मुस्लिम समाजावर होत असलेले धार्मिक , आर्थिक , शारीरिक , सामाजिक हल्ले पाहता अपवाद वगळता सत्ताधारी व विरोधक कोणीही मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभे राहत नाहीत. सहकार्य करत नाहीत. मुस्लिम बांधव सर्वच सणाला मोठ्या मनाने सहकार्य करत आहेत. परंतु विशेषतः काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे फक्त वादग्रस्त भूमिकेमध्येच अग्रस्थानी असतात. इतर वेळेला त्यांना मानवता दृष्टिकोन पचनी पडत नाही. त्यामुळे शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांच्या क्रांतिकारी महाराष्ट्रात मुस्लिम समाज हा राजकीय अनाथ झाला आहे . त्यांना कुणी आता वाली राहिलेलं नाही. हे उघड सत्य समाजाने स्वीकारले आहे.
त्यामुळे मुस्लिम समाजाला येणाऱ्या काळात खूप धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. जो आमच्या अडचणीत पाठीशी उभे राहतील त्यांना जाता पाठिंबा देणे गरजेचे आहे. धार्मिक आवाहन करून आता राजकारण करता येणार नाही. महाराष्ट्रात सर्व धर्माचे नेते राज्यभर दौरा करताना आपण पाहतो परंतु सत्तेची चावी हातात असणारे अथवा विधानसभा , विधानपरिषद , राज्यसभा लोकसभा प्रतिनिधी राज्यभर दौरा करून समाजाच्या अडचणी समजून घेत नाहीत. अशी खंत अनेक मुस्लिम नेत्यांनी व्यक्त केली.
मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेते लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे परखड मत उत्तरातील सामाजिक कार्यकर्ते सादिकभाई शेख यांनी मुद्दा उपस्थित केला. त्याला सर्वांनीच एकमुखाने पाठिंबा दिला आहे.
मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या स्वंयसेवी संस्था, एन जी ओ यांची मुंबई येथील इस्लामिक जिमखाना येथे चिंतन बैठक झाली . एम. एम. एन एफ चे अध्यक्ष जाकिरभाई शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार अमीन पटेल , आमदार साजिद खान पठाण , परभणी भाजप अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मतीन तांबोळी व
महिला प्रतिनिधी गजाला आपा, डॉ कुरेशी व शेख यांनी शिक्षण विषयक मुद्दा उपस्थित केला. नागपूरचे रफिक सर यांनी नागपूर दंगलीबद्दल सूचक वक्तव्य केले. चिंतन बैठकीत ७८ विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली.
या सर्व मुस्लिम समाजाच्या प्रश्नाबाबत धोरणात्मक अंमलबजावणीत आमूलाग्र बदल दिसतील असे आश्वासन आ अमिन पटेल व आ साजीदखान पठाण यांनी दिले. गेली सात वर्षापासून राज्यव्यापी दौरे करून सरकारकडे मागणी केली जात आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या प्रश्नाकडे आता गांभीर्याने पाहिले जाते.
मुस्लिम समाजातील प्रमुख वक्त्यांसह सातारचे मुस्लिम नेते सादिकभाई शेख यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांच्यातील ड्रॉप आउट रेट कमी करण्यासाठी उपाययोजना करणे , मुस्लिम मुली व महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्कुल कॉलेज आणि स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, वसतिगृह उभे करणे, सायबर क्राइम ब्रँचच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर होणारे हल्ले रोखून एकता अबाधित राखणे , प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिमांसाठी बहुउद्देशीय हॉल जमातखाना बांधणे, हेट स्पीच प्रकरणात मुस्लिमांवर कठोर कारवाई होते परंतु इतरांना सूट दिली जाते अश्यावेळेस कायद्याप्रमाणे सर्वांवर एक सारखी कारवाई व्हावी, मुस्लिम मोहल्ल्यात ड्रग्स ,नशेचे पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. त्यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जावी .विशाळगड ला एक न्याय आणि नागपूरला एक न्याय असे का? हा प्रश्र्न उपस्थित केला .
डॉ अस्लम बारी यांनी प्रास्ताविक व सूत्र संचलन केले. झाकीर शिकलगार यांनी १५ कलमी योजनाची अंमलबजावणी झाली पाहिजे. याबाबत आग्रह धरला.
मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल , अकोल्याचे आमदार साजीदखान पठाण आंतरराष्ट्रीय शायर नईम फराज यांनी सर्व मुद्दे ऐकून घेत विधानसभा आणि शासकीय पातळीवर योग्य ती पाऊले उचलणार असे आश्वासन दिले. भाजप युवा मोर्च्याचे मतीन तांबोळी यांनी शासन पातळीवर मागण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. हुडा टेकलोनॉलॉजीचे सदरूल्लाह , ग्लोबलचे अबिदभाई, इसरारभाई, उमैर इब्जी, अल हिदायाचे डॉक्टर साहेब, हसन मुलाणी व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहसीन शेख, अरिफभाई आणि एड अमीन सोलकर साहेब यांनी परिश्रम घेत उत्कृष्ट नियोजन केले. अरिफभाई यांनी आभार मानले .