श्रीरामपूर:-कैद्यांनी तयार केलेल्या लाकडी फर्निचरचे मुंबईत प्रदर्शन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कैद्यांनी तयार केलेल्या लाकडी फर्निचरचे मुंबईत प्रदर्शन.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) कोणत्याही व्यक्तीला एखाद्या लहान मोठ्या गुन्हेगारीतुन न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर व त्याचा जामीन मंजूर न झाल्यास त्याला दिलेली शिक्षा त्या व्यक्तीला चार भिंतीच्या आत मुक्कामी राहून अर्थात ( कारागृहात ) पुर्ण करावी लागते. मग ती ६ महिने जन्मठेपची असो त्याला कैदी म्हणून शिक्का लागतो. आता नवीन नियमानुसार कैद्यांना (बंदी ) म्हणतात. अशाच बंदीचे जेलच्या आत मनपरिवर्तनासाठी कुंटुंबातील सदस्या पासून थोडा विसर व्हावा याकरिता त्याच्या आवडीनुसार अनुभवाच्या आधारे त्याला काम दिल्या जाते. त्या कामाचा त्याला मोबदला पण मिळतो. प्रत्येक सेंट्रल जेलला एक सुतार विभाग असतो.तेथे लाकडी फर्निचर पुरविल्या जाते. याच जेलमधील सुतार विभागाचे सर्वांत मोठे १० जुनला मुंबईत मंत्रालयात आयोजित केलेल्या प्रदर्शनाचा वृत्तांत
कारागृहातील प्रदर्शनी
१० जुनला मुंबईतील मंत्रालयात महाराष्ट्रतील काही निवडक कारागृहातील बंदिनी तयार केलेल्या वेगवेगळ्या विभागातील वस्तू व साहित्याचे प्रदर्शनाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर सहित अनेक मंत्री उपस्थित होते .लाकडी वस्तू दिसायला आकर्षक व लेखणी असल्याने मंत्र्याची व मुंबईतील नागरिकांची ओढ सर्वोत्तम फर्निचर पाहण्यात व खरेदी करण्यास होती लाकडी फर्निचर मध्ये खुर्च्या सोपासेट देवपाठ मोबाईल स्टॅन्ड लाकडी बैल जोडी चाय स्टे देवघर पलंग आराम खुर्च्या अशा अनेक वस्तूचे फर्निचर होते कुठल्या सुतार बांधवांनी ही फर्निचर तयार केली असेल याचा शोध वर्धा येथील रहिवासी एका शिपाई पदावर मुंबईतील जल विभागात कार्यरत आहेत तो पण सुतारच आहे त्यांच्याकडून माहिती घेत आहे सर्वप्रथम त्यानेच वृत्तवाहिनीला बातम्या पोहोचल्या . असू शकतो हा कलाकार आपलाच सुतार दुसऱ्या जिल्हातून उत्तम सुतारकाम करणारा बदलीवर पुण्यात त्याला पाठवीले असेल . एक विशेष म्हणजे गुन्हेगार बंदी म्हणता येणार नाही . मला दुसरी घटना आठवलेली सांगतो चेक बॉर्न ह्या केसमध्ये सत्तरा वर्षापूर्वी वर्धा जेलला हिंगणघाटच्या डांगरी वार्डाच्या राखुंडेला ( सुतार ) न्यायलयाने केवळ चारशे रुपया करिता आठ्ठ महिन्याची शिक्षा दिली होती त्याला सुतारकाम येत नव्हते . कसा तरी लाकडाला रंधा मारला वाकडे तिकडे छिद्रे करून स्टुल . पाट . बनवायचा शेवटी त्याला दुसरे काम देण्यात आले . प्रत्येक गुन्हेगार हा चांगला माणूस व काही हाताशी उद्योग घेऊन बाहेर पडावा हे जेलचे सुधारणा व ब्रीद आहे . परंतु न्यायलयात हिरवे व पिवळे पान एकाच पात्रात मोजल्या जाते . व त्याचे वजनही सारखेच ठरवल्या त्यामुळे कधी न कळत नशिबा शनी काय घडेल हे कोणालाच सांगता येणार नाही.