कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोपूज:-(खटाव)-ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूजचे थकीत ऊस बिल दिनांक 1/7/2025 रोजी जमा होणार…???

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूजचे थकीत ऊस बिल दिनांक 1/7/2025 रोजी जमा होणार…???

[कारखाना प्रशासन व शेतकरी यांच्या चर्चे नंतर 1/7/2025 पर्यंत आंदोलन स्थगित.]

गळीत हंगाम 2024-25 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस गाळप साठी दिला होता परंतु त्या शेतकऱ्यांची ऊसबिले आजपर्यंत मिळालेली नाहीत त्यासाठी रयत क्रांती संघटना खटाव तालुका अध्यक्ष मा.नितीन कुलकर्णी यांच्यामार्फत कारखाना प्रशासनास एफआरपी सहित शेतकऱ्यांचे ऊस बिल दिनांक 23 जून 2025 पर्यंत न दिल्यास दिनांक 25 जून 2025 रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन दिले होते.

परंतु कारखाना प्रशासनाने सदर निवेदनास केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल दिले नाही त्यामुळे आज त्यामुळे आज बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी बेमुदत धरणे आंदोलन सकाळी 11.30 वाजता सुरू करण्यात आले होते.
उपोषण स्थळे ग्रीन पावर शुगर लिमिटेड कारखान्याचे प्रशासन व शेतकरी तसेच रयत क्रांती संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये थकीत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले कारखाने जाहीर केलेल्या दरानुसार दिनांक 1 जुलै 2025 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या संबंधितांच्या खात्यावर जमा करीत आहोत असे आश्वासन कारखाना प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर सर्व शेतकरी बांधवांना विचारात घेऊन रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख मा. सचिन नलवडे आबा यांच्या मार्गदर्शनानुसार सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
तसेच कारखाना प्रशासनाने दिनांक 1 जुलै 2025 पर्यंत थकीत ऊसबिल संबंधितांच्या खात्यावर जमा न केल्यास 2 जुलै ला कारखान्याच्या कार्यस्थळावर बेमुदत धरणे आंदोलन पुन्हा सुरू करून जोपर्यंत शेतकऱ्यांचे बिल जमा होत नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन स्थगित होणार नाही असे सर्व शेतकऱ्यांना मा.सचिन नलवडे यांनी आश्वासन दिले आहे.
आंदोलन स्थळी रयत क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.सचिन नलवडे आबा, स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्रीकांत लावंड, रयत क्रांती संघटना खटाव तालुका अध्यक्ष मा.नितीन कुलकर्णी काका, रयत क्रांती संघटना कराड तालुका अध्यक्ष मा. विशाल पुस्तके,मा.सौरभ चव्हाण तसेच युवा नेते-अमोल कदम, दिलीप यादव, रमेश पिसाळ व औंध पोलीस प्रशासन तसेच खटाव, कराड, कडेगाव,खानापूर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button