आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी चिंचवड:- ११ -११-२०२२ पशुवैद्यकीय (मांजरांसाठीचे धोरण ).

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

पिंपरी, दि. ११ नोव्हेंबर २०२२:-  शहरातील बेवारस व भटक्या मांजरींचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याची कार्यवाही तसेच उपाययोजना करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलेल्या धोरणासह पाळीव मांजरींकरीता महापालिकेच्या वतीने ऑनलाईन परवाना देण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा विषय महापालिका सभेपुढे मांडण्यात येणार आहे.

नव्याने तयार करण्यात आलेल्या या धोरणाबाबत माहिती देताना पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले म्हणाले की, भारत सरकारच्या भारतीय जीव जंतु कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बेवारस व भटक्या मांजरींचे प्रमाण वाढून उपद्रव होऊ नये यासाठी त्यांचे संतती नियमन शस्त्रक्रिया म्हणजेच निर्बिजीकरण व लसीकरण करणे आवश्यक आहे. संतती नियमन शस्त्रक्रिया कार्यक्रम प्रभावीपणे राबवून वाढत्या मांजरींची संख्या आटोक्यात आणणे शक्य आहे. संख्या आटोक्यात आल्यावर आपोआप त्यांच्यापासून  उपद्रव नियंत्रित राहणार आहे.  लसीकरण केल्याने त्यांच्यापासून होणारा रोग संसर्ग साखळी खंडीत झाल्यामुळे  मानवी आरोग्य अबाधित राखणे शक्य होणार आहे. तसेच त्यांची संख्या नियंत्रित राहिल्याने होणारे अपघात व इजा तसेच त्यासंबंधित तक्रारीची संख्या आटोक्यात राहणार आहे. त्या अनुषंगाने सद्यस्थितीत महापालिकेच्या पशुवैद्यकीय या ठिकाणी मांजरांसाठी स्वतंत्र ‘कॅट वार्ड’ विकसित करण्याचे काम सुरु आहे.  पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भटक्या व मोकाट उपद्रवकारक मांजरांची संख्या मर्यादित राहावी.  यासाठी पशुवैद्यकीय विभागामार्फत त्यांचे  निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. या धोरणास  स्थायी समितीसह महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे.

पाळीव मांजरांची माहिती संकलित करून त्यानुसार त्यांचे आरोग्य व उपद्रवाबाबतच्या उपाययोजना यावर योग्य नियोजन करण्यासाठी पाळीव मांजरींकरीता महापालिकेच्या वतीने ऑनलाईन परवाना देण्यात येणार आहे. या विषयास  स्थायी समितीसह महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे. या विषया बद्दल माहिती देताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले की, श्वानांइतकेच मांजराना देखील पाळण्यासाठी  शुल्क आकारण्यात येणार असून त्यासाठीचा परवाना दिला जाईल. नवीन परवाना काढण्यासाठी ७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार असून परवाना नुतनीकरणासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहे. परवाना नुतनीकरण करण्यास विलंब केल्यास १० रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे.   मांजर पाळण्याच्या  परवान्याकरीता अटी व शर्ती लागू आहेत. या परवान्याची कायदेशीर मुदत परवाना प्राप्त झाल्यापासून एक वर्षापर्यंत असून तो दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक राहील. महापालिका आयुक्त यांनी वेळोवेळी ठरविलेले शुल्क अदा केल्यानंतर अटी व शर्तीस अधीन राहुन हा परवाना देण्यात येईल. परवाना धारकाने प्राप्त परवाना सोबत बाळगणे आवश्यक राहील व तो महापालिका आयुक्त किंवा त्यांनी नेमणुक केलेल्या प्राधिकृत अधिका-याने मागणी करताच सादर करणे आवश्यक राहील. पाळलेल्या मांजराचे रेबीज लसीकरण करणे संबंधित मालकांवर बंधनकारक राहील. परवाना धारकाने सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मांजर मोकळे सोडता कामा नये, तसेच या मांजरापासून इतरांना दुखापत होणार नाही, सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या मांजरीमुळे कुठल्याही प्रकारची घाण निर्माण होणार नाही, मांजरापासून कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची परवाना धारकाने दक्षता घेणे आवश्यक असणार आहे. मुंबई प्रांतिक म.न.पा. अधिनियम १९४९ प्रकरण परिशिष्ट १४ नियम २२ सह कलम ३८६ (१) यामधील नियम व तरतुदी परवाना धारकावर बंधनकारक राहतील. कोणत्याही व्यक्तीला मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ प्रकरण परिशिष्ट १४ नियम २२ (१) (अ) अन्वये परवाना प्राप्त केल्याशिवाय मांजर पाळता येणार नाही. परंतु परवाना घेतला असेल आणि त्याचे नुतनीकरण केले नसल्यास विना परवाना मांजर पाळले आहे, असे समजण्यात येऊन नियमानुसार कारवाईस संबंधित व्यक्ती पात्र राहणार आहे. हा  परवाना घेतल्यानंतर मानवी आरोग्यास तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या कारणावरून महापालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करणे  किंवा दिलेला परवाना रद्द करण्याचे अधिकार महापालिकेकडे राखीव असणार आहेत, अशी माहिती डॉ. दगडे यांनी दिली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button