सातारा:-फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची धडाडीची कामगिरी, तब्बल सहा वर्षांपासून फरारी असलेल्या तीन आरोपीला अटक.
पत्रकार समीर खान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार समीर खान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची धडाडीची कामगिरी, तब्बल सहा वर्षांपासून फरारी असलेल्या तीन आरोपीला अटक.
फलटण ग्रामीण / समीर पठाण
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. त्याअनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील फरारी व पाहीजे आरोपी आहेत ते चेक करून जास्तीत जास्त आरोपींना अटक करावी .त्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा नंबर 28/ 2018 कलम 143 147 148 325 324 323 504 भादवि सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(१) 135 गुन्ह्यातील पाहिजे आरोपी
1. कुलिया उर्फ गोविंद भगवान काळे वय 70 वर्ष
2. लाकड्या भगवान काळे वय 30 वर्ष
3. पिंगा पुण्या काळे वय 35 वर्ष राहणार सोनवडी तालुका फलटण
दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे कोंबिंग आॅपरेशन करण्यात आले . त्यावेळी सदर आरोपी त्यांच्या राहत्या घरी मिळुन आले.
गेली सहा वर्षांपासून ते फरारी असल्याने त्यांना पोलीस ठाण्यास आणून सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
सदर ची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले असता, वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शांतीलाल ओमासे ,पोलीस नाईक तात्या कदम ,पोलीस अंमलदार अमोल जगदाळे , दडस, नितीन चतुरे ,यांची टीम तयारी केलेली असता वरील कारवाई करण्यात आली.