खटाव:-मायणी येथे पंढरपूर रस्त्यावर डांबरी स्पीड ब्रेकर बसवा——डॉक्टर दिलीप येळगावकर.
पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
मायणी येथे पंढरपूर रस्त्यावर डांबरी स्पीड ब्रेकर बसवा——डॉक्टर दिलीप येळगावकर.
मायणी प्रतिनिधी—खटाव तालुक्यातील मायणी व्यापारी पेठेचे गाव असून या गावातून मल्हार पेठ पंढरपूर रस्ता जातो हा रस्ता दिघंची ते मायणी 2022 मध्ये हायवे झाला असून या रस्त्यावर आत्तापर्यंत अकरा अपघात झाले अनेकांचे बळी गेले आहेत तरी या रस्त्यावर डांबरी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी खटावमांचे माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी केली आहे अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की शासनाने 96 किलोमीटर 11 मीटर रुंदीचा दिघंची ते मायणी 46 किलोमीटरचा रस्ता हायवे केला असून या रस्त्याने वाहने भरधाव जातात त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत अनेकांची जीव गेले आहेत शासनाने मध्यंतरीच्या काळात प्राथमिक शाळा सरुताई देवस्थान ट्रस्ट व अभयारण्य येथे एक पट्टी स्पीडबेकर बसवला आहे यामुळे हा स्पीड बेकर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा या स्पीड बेकर मुळे कोणताही चालक आपला पाय ब्रेक वर ठेवत नाही. तरी हे केलेले स्पीड ब्रेकर तकलादू आहेत तरी शासनाने डांबरी स्पीड बेकर बसवून अपघात मुक्त रस्ता करावा अशी मागणी त्यांनी केली.