कराड:-स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत श्री शारदोत्सव निमित्त शिक्षकांच्या साठी ” स्वरचित उखाणा स्पर्धा” संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत श्री शारदोत्सव निमित्त शिक्षकांच्या साठी ” स्वरचित उखाणा स्पर्धा” संपन्न.

कराड:- कराड येथील लाहोटी कन्या प्रशालेत श्री शारदोत्सव अतिशय दिमाखात,आनंदात,उत्साहात संपन्न झाला. पहिल्या दिवशी श्री शारदेची प्रतिष्ठापना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ हेमलता जंगम, कार्याध्यक्ष सौ मिनाली दरबान भोसले, उपकार्याध्यक्ष अमृत गिजरे, सर्व विद्यार्थिनी, सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, यांच्या उपस्थित करण्यात आली. प्रशालेची माजी विद्यार्थिनी सौ पूजा बक्षी हिरेमठ (API) दापोली या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या उत्सवानिमित्त प्रशालेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने इयत्ता पाचवीसाठी रामायणातील पौराणिक कथा, सहावी साठी विविध वेशभूषा, सातवी साठी जाहिरात सादरीकरण, आठवीसाठी केशरचना, नववी साठी सॅलड डेकोरेशन, तर दहावीसाठी समूह नृत्य स्पर्धा, तसेच पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी साठी रांगोळी स्पर्धा, आयोजित करण्यात आल्या होत्या.सर्व विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने आणि आनंदाने या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. सर्व स्पर्धांचे परीक्षण बाह्य परीक्षकांच्या मार्फत करण्यात आले आणि त्याच्यातून नंबर काढण्यात आले.
यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे खास शिक्षकांच्या साठी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्याकडे ज्या 64 कला आहेत त्याच्यातीलच एक कला म्हणजे “उखाणा” यावरती आधारित “स्वरचित उखाणा” स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये एकूण 35 शिक्षकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ मधुरा कल्याण कुलकर्णी आणि सौ स्वाती उमेश शेंडे यांनी काम पाहिले. यातून प्रथम पाच आणि उत्तेजनार्थ तीन क्रमांक काढण्यात आले. सौ .हेमलता जंगम यांचा प्रथम क्रमांक, श्री बाळासाहेब देसाई यांचा द्वितीय क्रमांक , सौ.सुचेता पाटील यांचा तृतीय क्रमांक, सौ मीनाली भोसले यांचा चतुर्थ क्रमांक तर सौ. प्रांजली कुलकर्णी यांचा पाचवा क्रमांक आला. उत्तेजनार्थ श्री युवराज पुकळे, सौ अदिती फडके, सौ.जानवी नावडकर यांचा क्रमांक आला.या नावीन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता जंगम यांची होती.सर्वांच्या सहकार्याने, उत्तम नियोजनाने सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.




