दक्षिण आफ्रिका:-U19WOMANS T20 WORLD CUP -भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, भारताचा इंग्लंड वर 7 विकेट नि विजय-पहिल्याच विश्वचषकात भारतीय महिलांचा बोलबाला…
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
U19WOMANS T20 WORLD CUP -भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, भारताचा इंग्लंड वर 7 विकेट नि विजय-पहिल्याच विश्वचषकात भारतीय महिलांचा बोलबाला…
(क्रीडा)दक्षिण आफ्रिका :: दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या पहिल्याच महिलांच्या 19 वर्षाखालील विश्वचषक सामन्यात शेफाली वर्मा च्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिलांनी इंग्लंडचा सात विकेटने पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले….
अंतिम सामन्यात सेनवेस पार्क येथे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला भारतीय महिला गोलंदाजांनी सामूहिक कामगिरी च्या जोरावर इंग्लंडचा डाव 17.1 ओव्हर मध्ये 68 धावा मधेच संपवला. भारतीय महिला कडून साधू ,देवी आणि चोप्रा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
69 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी सौम्या तिवारी (24*) व व त्रिशा (24) याच्या खेळीच्या जोरावर 69 धावांचे लक्ष्य 14 ओव्हर मध्ये सहज पार करून भारतीय महिलांच्या इतिहासात भारतासाठी पहिला विश्वकप जिंकून दिला.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)