श्रीरामपूर:-ऋषीकेश छल्लारे यांचे अपघाती निधन ……
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
ऋषीकेश छल्लारे यांचे अपघाती निधन ……
माळेवाडी ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते व असंघटीत कामगार संघटनेचे नेते गणेश उर्फ किशोर भारत छल्लारे यांचे चिरंजीव ऋषिकेश किशोर छल्लारे (वय १८ ) मोटारसायकल व डंपर अपघातात उपचारा दरम्यान निधन झाले भोकर सोसायटीचे माजी चेअरमन . माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे कट्टर समर्थक असलेले गणेश उर्फ किशोर छल्लारे यांचा एकुलता एक चिरंजीव ऋषिकेश किशोर छल्लारे हा शनिवार दि . ७ जुन च्या सायंकाळी खोकर फाटा येथील लक्ष्मीमाता मिल्क जवळ सुरु असलेल्या कामावर देखरेख करत असताना अचानक मोटार सायकल – डंपर अपघातात गंभीर जखनी झाले
अपघात घडल्याचे समजताच स्थानिक युवकांचे त्यास तातडीचे प्रथम श्रीरामपुर येथील कामगार हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले तेथुन पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले तेथुन पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथील मॅककेअर हॉस्पीटल मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले परंतु गंभीर जखमी ऋषीकेश याने सुमारे तीन तास मृत्यूशी झुंज दिली दुर्दैवाने त्यावर काळाने घाला घातला आणि रात्री ८ .30 च्या सुमारात त्याचे निधन झाले
त्याचे पश्चात आई वडील . आजी आजोबा . एक बहीण . चुलते . चुलती चुलत भाऊ बहीन असा परिवार आहे
चि ऋषिकेश छल्लारे याचेवर काल दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.