साताऱ्यात ज्योतिष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
साताऱ्यात ज्योतिष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू.
मायणी प्रतिनिधी—–सातारा येथील संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ यांच्यामार्फत ज्योतिष शास्त्राचा प्राथमिक ज्योतिष विशारद या सहा महिन्याचा ज्योतिष अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाइन या दोन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया 5 जून पासून सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे यांनी दिली या संस्थेचे संस्थापक डॉक्टर विकास खिलारे हे ज्योतिर्विद्या वाचस्पती असून गेली पंधरा वर्षे ते उत्कृष्ट विवाह विषयक, व राजकीय ज्योतिष मार्गदर्शक, तसेच ज्योतीष शिक्षक म्हणून सातारा येथे कार्यरत आहेत भावी वैवाहिक जोडीदाराच्या शोधातील एक सच्चा मार्गदर्शक अशी त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे ज्योतीष शिकण्याची आवड व इच्छा असणाऱ्यांनी ज्योतिष शिकता यावेतसेच समाजाचा उत्कृष्ट ज्योतिष मार्गदर्शक मिळवून देण्यासाठी व ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी संस्थेची स्थापना झाली आहे आजपर्यंत महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी संस्थेअंतर्गत ज्योतिष शिक्षित होऊन मार्गदर्शक ही झाले आहेत संस्थेची ही 23 वी बॅच असून ही बॅच 15 जून पासून सुरू होत आहे पश्चिम महाराष्ट्रातील ज्योतिष शिक्षण देणारी ही अग्रगण्य संस्था असून तसेच मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुकांनी संपर्क करावा असे आव्हान प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे यांनी केले आहे.