ताज्या घडामोडी

वाई:-कृषि विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी यांनी लाभ घ्यावा- श्री शेंडे

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

कृषि विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी यांनी लाभ घ्यावा- श्री शेंडे

सध्या खरीप हंगामाची तयारी जोरात सुरु आहे. त्या अनुषंगाने कृषि विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी वाई श्री प्रशांत शेंडे यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषि विभाग व आय जी एल अग्रीकॉन फर्टीलायजर्स यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी श्री शेंडे यांनी कृषि विभागाच्या सुरु असलेल्या बियाणे उगवण क्षमता, बिजप्रक्रिया, शंखी गोगलगाय नियंत्रण मोहीम तसेच फळबाग लागवड, महा डी बी टी पोर्टल वरील योजना, यासारख्या विविध अनुदानच्या योजनाची सखोल माहिती दिली. जास्तीत जास्त शेतकरी यांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा व विविध अनुदानाच्या योजना साठी अर्ज करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी श्री नितीन शिंदे यांनी हळद उत्पादन लागवड तंत्रज्ञान विषयी सखोल माहिती दिली. तसेच आय जी एल व अग्रीकॉन कंपनी च्या विविध उत्पादनाची माहिती दिली.
तंत्र अधिकारी श्री तेजदीप ढगे यांनी यावेळी कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता वापर याविषयी माहिती दिली व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले. श्री निखिल मोरे उप कृषि अधिकारी यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
श्री रवींद्र बेलदार मंडळ कृषि अधिकारी यांनी आभार मानले. यावेळी श्री शांताराम गोळे कृषि अधिकारी पंचायत समिती, सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती भाग्यश्री कदम,आय जी एल कंपनी चे श्री सुनील निकत, प्रतीक शिर्के, तेजस गुलूंबकर, वाई मंडळ मधील सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, सयाजी पिसाळ, अतुल भोसले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button