RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी माननीय प्राध्यापक धीरज सावंत सर यांची नियुक्ती
प्रतिनिधी :- शिवाजीराव टिके महाराष्ट्र

Rps इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी माननीय प्राध्यापक धीरज सावंत सर यांची नियुक्ती करण्यात आली. निर्भीड धडाडीचे रोखठोक भूमिका मांडणारे अशी ख्याती असलेले धीरज सावंत सर एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आहेत. आयुष्यात काही अशा घटना घडल्या त्यामुळे त्यांना पत्रकारितेमध्ये रुची निर्माण झाली. आज समाजात घडत असलेले अन्याय अत्याचार भ्रष्टाचार अशा गोष्टीं विरुद्ध काम करण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे शस्त्र हातात घेतले. गोरगरीब लोकांना न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. माननीय प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष संपादक तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय शिवाजी टक्के साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्राध्यापक धीरज सावंत सरांची नियुक्ती करण्यात आली. आपण प्रामाणिकपणे कशा पद्धतीने असोसिएशनमध्ये काम करू याची ग्वाही दिली. आर.पी. एस. इंटरनॅशनल प्रेस रेपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युज यांच्याकडून हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा