वाई तालुक्यातील सामूहिक गाथा पारायणासाठी आजपासून सुरुवात…
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई. दि.27
वाई तालुक्यातील सामूहिक गाथा पारायणासाठी आजपासून सुरुवात…
दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणाऱ्या वाई तालुक्यांमध्ये गाथा पारायण सोहळा गेल्या तीन वर्षांपासून सुरू केला आहे तसेच याही वर्षी साठे धर्मशाळा मंगल कार्यालय,वाई येथे गाथा पारायणाचे मोठ्या उत्साहाने नियोजन केले आहे. हा पारायण सोहळा 27 मे ते 3 जून पर्यंत चालणार आहे.यामध्ये बहुतांशी युवा वारकरी सहभाग घेताना दिसत आहेत. आपली संस्कृती जपण्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर सध्या काळाची गरज आहे ती युवा पिढीने संस्कृती जपण्याची आणि हे काम वाई तालुक्यातील युवा वारकरी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत आहेत. जुन्या पिढीचा वारसा ही युवक पुढे नेताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा वाचनास आजपासून सुरुवात झाली. यामध्ये मोठ-मोठे महापुरुष यांची कीर्तने ठेवण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी 100 टाळकरी व 100 वाचक यांची उपस्थिती येथे दिसून येत आहे. यावरूनच या सोहळ्यासाठी लोकांच्या मनात किती आपुलकी प्रेम आहे हे दिसून येत आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांची आहे ते संत नामदेव महाराजांचे वंशज आहेत.
दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. भागवत महाराज कबीर तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प.महादेव महाराज राऊत चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. उमेश महाराज दशरथे पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प.बापूसो महाराज देहूकर संत तुकाराम महाराजांचे वंशज सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प.भरत महाराज पाटील सातव्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर तर कालची कीर्तन सेवा गुरुवर्य संतवीर युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची आहे.