ताज्या घडामोडी

महाबळेश्वर:-अशोक भालेराव आणि लता भालेराव यांच्या सामाजिक कार्यामुळे धम्मरत्न पुरस्कार जाहीर.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

अशोक भालेराव आणि लता भालेराव यांच्या सामाजिक कार्यामुळे धम्मरत्न पुरस्कार जाहीर.

 

आंबेडकर घराण्याशी कायम एकनिष्ठ राहणारे भिमनगर तालुका महाबळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते, महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक धार्मिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसिव भुमिका घेऊन, समाजहितासाठी अहोरात्र कार्यरत राहून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी विनम्रपणे काम करणारे पंचायत समिती वाईचे विस्तार अधिकारी,भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम अध्यक्ष आयुष्यमान अशोक भालेराव आणि त्यांना नियमित साथ देणाऱ्या त्यांच्या धम्मचारीनी लता भालेराव या उभयतांना बंधुत्व प्रतिष्ठानचा बहुमोल अशा धम्मरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना, विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सातारा जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.गेली ३० वर्षं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून महाउपासिका मिराताई आंबेडकर आणि डॉ.भिमराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म कार्यासाठी अविरतपणे कार्यरत आहेत.बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, उत्कृष्ट धम्म प्रवचनकार, सामाजिक व धार्मिक कार्यासाठी जिल्ह्यात प्रामाणिक प्रयत्न करीत असणारे, सर्वांना सोबत घेऊन समाजहितासाठी सातारा जिल्हा नेहमीच अग्रेसिव ठेवण्यासाठी वैचारिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व असुन त्यांना नियमित साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी लताबाई भालेराव याही आपल्या पती प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.भिमनगर ग्रामपंचायत सरपंच म्हणून दहा वर्षे दैदिप्यमान कार्य करुन आपला गावही सामाजिक धार्मिक कार्यासाठी कार्यरत ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
रविवार दिनांक २५मे २०२५ रोजी सकाळी ११वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत या दोन्ही उभयतांना धम्मरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button