वाई:-!!! शिरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
!!! शिरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!
वाई तालुक्यातील जनता शिक्षण संस्था वाई संचलित शिरगाव मधील माध्यमिक विद्यालयाचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 100% निकाल.
माध्यमिक विद्यालय शिरगाव मध्ये प्रथम क्रमांक दिशा संजय सुतार 91% द्वितीय क्रमांक धनश्री संदीप भोसले, 87.20%, तृतीय क्रमांक गौरी जगन्नाथ कानडे 83% याचबरोबर शंभुराजे शिंदे 80% , अमृता कुंभार 77.80%, सुशांत भोसले 76.40% असे गुण मिळवून संस्थेची शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी जपली.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मदन दादा भोसले, सचिव श्री जयवंतराव चौधरी, सर्व संचालक आणि पदाधिकारी यांनी विद्यालयाचे कौतुक व अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ मंडळ, सावित्रीबाई फुले महिला ग्राम संघ ,शिक्षणप्रेमी यांच्यावतीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.