राहता:-दिनकर वाकचौरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रवरानगर( वार्ताहर )
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातीचे इलेक्ट्रिक विभातील दिनकर मुरलीधर वाघचौरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त इलेक्ट्रिक विभागाच्या वतीने व इले मित्र परिवाराच्या वतीने कारखान्याच्या पॅनल बोर्ड येथे सत्कारचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होते .कार्यक्रमास कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर ए. पी.राऊत साहेब. यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सत्कारमूर्ती दिनकर वाकचौरे म्हणाले की मी वयाच्या आठराव्या वर्षी कारखान्यात सेवेत रुजू झालो आज मी रिटायर झालो असलो तरी आजच्या दिवस माझ्या एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हासु असू माझ्या जीवनातील वेळ जेवढा मी माझ्या परिवारा बरोबर न घालवता तेवढा वेळ मी नोकरीत करत असताना सहकार्याबरोबर घालवला मी 42 वर्ष सेवा केली . तरी पण आजही मला कारखान्याचा पहिला दिवस आठवतो मला इलेक्ट्रिक विभागातील सर्व सहकाऱ्यांनी मला मदत व प्रेम दिले त्याबद्दल मी सर्वचे ऋणी आहे यावेळी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे व्हा चेअरमन विश्वासराव कडू पाटील यांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या याप्रसंगी चिफ इंजिनिअर डी. डी. करंडक इलेक्ट्रिक विभागाची निमसे साहेब. निलेश खर्डे .प्रसाद भणगे. महेश खेमनर. इलेक्ट्रिक मित्र परिवार जनार्दन आहेर. अफजल पटेल संजय अनाप. सुभाष शिंदे. सत्यम तरकसे अक्षय बेलकर विलास घोलप. कुणाल गागरे. अनिल शिंदे यशवंत दिघे. रंगनाथ कडलग. गणेश लव्हाटे. जीवन गिरमे. सचिन घोगरे. अरुण ढमक सोमनाथ म्हस्के. रामदास गवई गोरख निर्मळ शंकर तांबे .सोपान पगारे. रोकडे शरद दरंदले. योगेश विखे सात्रळ येथील पत्रकार दादा भाऊ वाकचौरे संजय वाकचौरेअनिल मुुर्तडक घोलप आण्णा अरुण दिघे सचिन घोगरे अनिल विखे पत्रकार कोंडीराम नेहे आदी याप्रसंगी उपस्थित होते.