महाबळेश्वर:-क्षेत्रमहाबळेश्वर चा रस्ता वाहतुकीसाठी खुला.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS
क्षेत्रमहाबळेश्वर चा रस्ता वाहतुकीसाठी खुला.
उदय हॉटेल ते क्षेत्र महाबळेश्वर कडे जाणात रस्ता चार चाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. जानेवारी २०२४ पासून आर सी सी रोडचे काम सुरू केल्या मुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. बंद असलेल्या हॉटेल उदय ते क्षेत्र महाबळेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या राज्यस्तरीय नगरोत्थान अभियानांतर्गत क्षेत्र महाबळेश्वर मुख्य रस्त्यासह डचेस रोड व लाॅडविक पॉईंट कडे जाणारा मुख्य रस्ता या तीन रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेशजी पाटील यांच्या प्रयत्नातून सदरच्या रोडचे काम पुर्ण करून घेण्यात आले उदय हॉटेल ते क्षेत्र महाबळेश्वर रोड वाहतुकीसाठी सुरू केला गेल्या मुळे आता नव्या रोडने जाताना विना अडथळा प्रवास होणार आहे स्थानिक वाहन चालक व पर्यटक यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे सदर रस्त्यावरून वाहतुक करताना धिम्या गतीने वाहने चालवावीत जेणे करून अपघात टाळता येतील असे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी स्थानिक नागरिक व पर्यटकांना आवाहन केले आहे. सदरचा रस्ता वाहतुकी साठी खुला केल्यामुळे महाबळेश्वर नगरपालिका व मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.