आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यात तिरंगा ध्वजासोबत रक्तदानाचा दिला संदेश,,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यात तिरंगा ध्वजासोबत रक्तदानाचा दिला संदेश,,,,

सातारा दि : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना त्याचा इव्हेंट म्हणून वापर काहीजण करतात. परंतु ,मानवता भावनेतून रक्ताचा पुरवठा गरजूंना व्हावा. या सामाजिक भावनेतून आज साताऱ्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तिरंगा ध्वजासोबतच रक्तदान हा संदेश देण्यामध्ये एम. बी. एफ. व कांग्राळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांना यश आले आहे.

बाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यामध्ये तरुणाईची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एका बाजूला घरावर तिरंगा ध्वज फडकवणे, पोस्टर बाजी करणे,रॅली काढणे अशा पद्धतीने इव्हेंट करण्यात येत असला तरी दुसऱ्या बाजूला अमृत महोत्सव स्वातंत्र्याचे वर्ष असूनही सुमारे १७५ नागरिकांना उपोषण, आत्मदहन, आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे .याचा गांभीर्याने सत्ताधाऱ्यांनी विचार करून या प्रतिनिधिक स्वरूपात प्रश्न सोडवणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना स्वातंत्र्य उपभोगण्यास सहकार्य करणे हा आहे. परंतु तसे न करता सत्तेचा वापर हा बळाचा वापर ठरू लागलेला आहे. हुकूमशाह पद्धतीने आंदोलन चिरडले जात आहे.
ही जरी नकारात्मक बाजू असली तरी समाजामध्ये सकारात्मक रित्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत. त्यामुळेच समाज व्यवस्था टिकून आहे. सातारा शहरातील राधिका रोडवरील सातारा सिटी बिजनेस सेंटर येथील जागेमध्ये आज मोठ्या प्रमाणात करण्याचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.. याला व्यापक प्रसिद्धी देऊन प्रसारमाध्यमाने आपले कर्तव्य पार पाडले. या वेळेला सुमारे १४० तरुणांनी रक्तदान करून आपल्या भारत देशाबद्दल असलेले खरेखुरे प्रेम दाखवून दिले आहे. त्यांचे अनेक मान्यवरांनी मनापासून आभार मानून त्यांना शुभेच्छा दिलेले आहेत. या उपक्रमाबद्दल जेष्ठ पत्रकार अजित जगताप, अमोल गंगावणे, मिलिंद कांबळे व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी कौतुक केले आहे.

एम.बी.एफ. सातारा व कांग्राळकर चॅरिटेबेल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. श्री बालाजी ब्लड बँक च्या वतीने या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पहार देण्यात आले तसेच सामाजिक भावनेतून
एम. बी. एफ. सातारा अध्यक्ष- श्रीधर कांग्राळकर
उपाध्यक्ष- मनोज देशमुख, युथ विंग चे
राहुल यादव,अक्षय शिंदे,अंकित मोहन जगताप यांनी मोलाचे योगदान दिले होते.
—————————————————————
फोटो – साताऱ्यात रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेले रक्तदात्यांना प्रमाणपत्र सादर करताना (छाया- निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button