वाई:-किसन वीर महाविद्यालयात ‘आठवणीतील भाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि. 17
किसन वीर महाविद्यालयात ‘आठवणीतील भाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, महाराष्ट्र विधानसभा सदस्य, देशाचे माजी संसद सदस्य, तसेच किसन वीर महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या जीवन व कार्याचा उद्घोष करणारे *आठवणीतील भाऊ* या पुस्तकाचे प्रकाशन दै. प्रभात, सातारा चे निवासी संपादक श्री. श्रीकांत कात्रे यांच्या हस्ते दिनांक १९ मे २०२५ रोजी किसन वीर महाविद्यालय, वाई येथे सकाळी ११.३० वा. खोली क्र A2A मध्ये संपन्न होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायणराव चौधरी, प्रकाशक श्री. राकेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकायत प्रकाशन, सातारा द्वारे प्रकाशित सदर पुस्तकाचे संपादन किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व सहयोगी प्राध्यापक डॉ. अंबादास सकट यांनी केले आहे.
किसन वीर महाविद्यालयात प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिनांक १९ मे २०२४ ते १९ मे २०२५ या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या १९ तारखेस स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत विविध मान्यवरांचे *आठवणीतील भाऊ* या विषयावर माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली. या स्मृती व्याख्यानमालेचे संयोजक, डॉ. अंबादास सकट यांनी सर्व व्याख्यानांचे एकत्रीकरण करून शब्दांकन स्वरूपात भाऊंच्या जीवनावरील हे पहिले पुस्तक वाचकांसमोर आणले आहे. सदर पुस्तकात प्रा. रमेश डुबल, डॉ. जयवंत चौधरी, अँड. प्रतापसिंह पिसाळ- देशमुख, डॉ. पंडित टापरे, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, सी. ए. उदभाई गुजर, श्री विजय वाघ, अँड. अजित केंजळे, प्रा. दिलीप जगताप, प्रा. श्रीकृष्ण जोशी, श्री अनिल उर्फ बाबा भोरे व प्रा. (डॉ.) प्रकाश पवार यांनी भाऊंच्या मासिक स्मृतिदिनी दिलेल्या एकूण बारा व्याख्यानांचा संग्रह आहे. या पुस्तकातून भाऊंच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडत गेले आहेत. सदर पुस्तकातून भाऊंचे आदर्शवत असे व्यक्तिमत्व, यशवंत विचार व नैतिकतेवर आधारित समाजकारण वाचकांसमोर ठेवले आहे. *आठवणीतील भाऊ* या पुस्तकाच्या माध्यमातून भाऊंचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहोचवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे संयोजकांना वाटते. भाऊंच्या प्रथम स्मृतिदिनी प्रकाशित होणारे हे पुस्तक पुढील काळात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच नवीन संशोधकांना दिशादर्शक ठरेल असा विश्वास संपादकांनी व्यक्त केला आहे. सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्यास सर्व क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.