पिंपोडे बुद्रुक:-सह्याद्री बँक विकासाच्या नूतनीकरण निवडणुकीसाठी सभासद सज्ज –अँड.संजीव कदम.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सह्याद्री बँक विकासाच्या नूतनीकरण निवडणुकीसाठी सभासद सज्ज –अँड.संजीव कदम.
पिंपोडे बुद्रुक दि : मुंबईसारख्या स्वप्न नगरीमध्ये माथाडी व कापड बाजार कामगारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सह्याद्री सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. आज सहकार क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. सहकार चळवळ टिकवणे हे महत्त्वाचे ठरले. बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी सहकार पॅनलच्या माध्यमातून सह्याद्री बँकेचा विकास केला आहे. यंदाच्या निवडणुकीत बँकेच्या विकास नूतनीकरण करण्यासाठी सर्व सभासद सज्ज झाले आहेत. असे प्रतिपादन बँकेचे हितचिंतक व ज्येष्ठ सभासद ॲड . संजीव कदम यांनी केले.
सह्याद्री सहकारी बँकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलच्या माध्यमातून विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व सभासदांशी विचार विनिमय करून सहकार पॅनलची निर्मिती केली आहे.
सह्याद्री सहकारी बँकेचे रोपटे उभे करणारे आदरणीय नामदेवराव कदम, गुलाबराव खोपडे ,भाऊसाहेब कदम, जयवंतराव चव्हाण, विठ्ठल राव शिंदे, लक्ष्मण पुजारी, आनंदराव फाळके, बाबुराव जाधव यांच्या विचाराचा वारसा जपण्याचे काम सहकार पॅनल करत आहे.
उद्योजक व सहकार क्षेत्रामध्ये निस्वार्थीपणाने काम करणारे पॅनल प्रमुख श्री पुरुषोत्तम माने , अँड . संजीव कदम, प्रल्हाद धुमाळ, अंकुश विचारे, सुरेश शिंदे,उत्तम भोसले, खाशाबा भिलारे, अरविंद कदम, शंकरराव गोडसे, अमोल निकम, प्रकाश बाबर, विजय चव्हाण, भरत चव्हाण, शांताराम मोहिते, सतीश निकम, सागर लेंभे ,दीपक लेंभे, अशोक साळुंखे, नरेंद्र वाघंबरे यांच्यासह पिंपोडे बुद्रुक, वडूथ, आसनगाव, सातारा रोड, जळगाव, नायगाव, नांदवळ सोनके ,पळशी, अंबवडे, रेवडी, तांबी, शिवथर, मालगाव,
आरळे, राऊतवाडी, लिंब, गोवे ,वाढे व जगतापनगर, अनपटवाडी, वाघोली, राऊतवाडी, बनपुरी, सर्कलवाडी , सोळशी, जगताप नगर, परिसरातील सह्याद्री सहकारी बँकेचे हितचिंतक व सभासद तसेच ठेवीदार व कर्जदारांनी या बँकेच्या निवडणुकी संदर्भात सकारात्मक रित्या सहभाग घेतला आहे.
सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आल्यामुळे सहकारातील अनुभव नसलेल्या विरोधकांनाही मतदानापूर्वीच आता डिपॉझिट जप्त होण्याची भीती वाटू लागलेली आहे. सर्व समावेशक असलेल्या सहकार पॅनलला उदंड प्रतिसाद लाभत आहे . मोठ्या फरकाने सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील व बँकेची घोडदौड कायम राखतील. असा विश्वास सहकारातील जेष्ठ व नवी मुंबई येथील शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळस्कर – पाटील यांनी व्यक्त केला आहे.
______________________________
चौकट — सह्याद्री सहकारी बँकेने भारतीय रिझर्व बँकेच्या आदेशानुसार व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे ४८ कोटीची आर्थिक उलाढाल २५८ कोटी पर्यंत पोहोचलेली आहे . लवकरच ३०० कोटीचा टप्पा पार करणार आहे. सह्याद्री सहकारी बँकेच्या एन.पी.ए. शून्य टक्के आहे. कांदिवली येथील चारकोप येथील सह्याद्री नगरच्या जागा ही कष्टकरी , माथाडी व कापड कामगारांच्याच हक्काची आहे .त्यावर डोळा ठेवणाऱ्या काही विरोधकांना जागा दाखवण्यासाठी कंदील चिन्हावरचे मत देऊन मतदानाने सुज्ञ सभासदांनीच सर्जिकल स्ट्राइक करायचा आहे. यासाठी ही निवडणूक असल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले.
रविवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी सात वाजता पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव या ठिकाणी सहकार पॅनलला पाठिंबा देण्यासाठी बँकेचे हितचिंतक व सभासदांची स्नेह मेळावा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
________________________&_____