कोरेगाव:-भाडळे येथील शेत पिक व बांधाचे नुकसान भरपाई साठी पंचनाम्याचे आदेश…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भाडळे येथील शेत पिक व बांधाचे नुकसान भरपाई साठी पंचनाम्याचे आदेश…..
कोरेगाव दि: मौजे भाडळे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील शेत मिळकत गट नंबर ५१८ मधील क्षेत्रातील केलेल्या चर उत्खननाचे व शेत मिळकतीतील पिकाचे बांधाचे नुकसान करण्यात आले आहे. याबाबत नुकसान भरपाई मिळावी म्हणून महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग तहसील कार्यालय कोरेगाव यांनी तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसान भरपाई कामी मंडळ कृषीधिकारी व मंडलधिकारी किन्हई यांच्या संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार कोरेगाव यांनी दिले आहेत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान करणाऱ्यांना नुकसान भरपाई चे आदेश पारित करण्यात आल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत माहिती अशी की, भाडळे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील शेतकरी व तक्रारदार अशोक बजरंग लिपारे यांच्या बाराबीघे नावाच्या शिवारातील गट नंबर ५१८ मध्ये विठ्ठल कृष्णा कारंडे राहणार धनगरवाडी भाडळे तालुका कोरेगाव हद्दीत शेतजमिनी शेजारी ऊस पिकाच्या शेतामधून दहा बाय साडेतीनशे फुटाचे जेसीबी च्या साह्याने चर खांद्याला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तक्रारदार व शेतकऱ्यांनी वाठार पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तसेच तहसीलदार कोरेगाव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची तातडीने गंभीर दखल घेऊन कोरेगाव तहसीलदार माननीय संगमेश कोडे यांनी कोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांना नै /कावि/५७/२०२५ दि:९/०५/२०२५ नुसार लेखी पत्र देऊन चर उत्खननाचे व शेती मिळकतीच्या पिकाचे बांधाच्या नुकसानी बाबत संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या महसूल विभागामध्ये दोन शेतकऱ्यांच्या वादानंतर तातडीने कारवाई होण्याच्या या प्रकाराने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे. अन्यथा याबाबत न्यायालयात जाण्याची काही जण पत्रानुसार सल्ला देतात. परंतु याबाबत एनसीआर स्वरूपातील गुन्हा ०२३२/२०२५ ने कलम ३४३(४) भारतीय न्याय संहिता २०२३ ने दाखल तक्रारीची संदर्भात दिवाणी न्यायालयातून तसेच फौजदारी न्यायालयातून योग्य ठिकाणी कायदेशीर कारवाई करणे कामी नुकसान भरपाई कामी वस्तुस्थितीचा मंडल कृषी अधिकारी व मंडलधिकारी यांच्या संयुक्त पंचनामा अर्जदार यांना देण्यात यावा असा आदेश केला आहे. कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये विनापरवाना घुसखोरी करून त्यांच्या शेतीमालाचे नुकसान करणे. हे आता संबंधित चर उत्खनन करणाऱ्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याशिवाय पर्याय राहिले नसल्याचे बोलले जात आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
——————————–
फोटो– भाडळे ता. कोरेगाव येथे दुसऱ्याच्या शेतात चर काढून शेतकऱ्याचे झालेले नुकसान…