सातारा:-भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम अध्यक्षपदी आयु.अशोक भालेराव यांची फेरनिवड जाहीर.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम अध्यक्षपदी आयु.अशोक भालेराव यांची फेरनिवड जाहीर.

सातारा:भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲड.सुभाष जौंजाळे साहेब, ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख आदरणीय डॉ.एस.के.भंडारे साहेब, ट्रस्टी डॉ.राजाराम बडगे साहेब, ट्रस्टी अरुण भाऊ पोळ, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी आदरणीय भिकाजी कांबळे साहेब, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय यु.जी.बोराडे गुरुजी, महाराष्ट्र संघटक आणि पूणे, सातारा विभाग प्रमुख आदरणीय दादासाहेब भोसले आणि आदरणीय विजय ओव्हाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा पश्चिमची कार्यकारिणी पदाधिकारी पुनर्गठन सभा शनिवार दिनांक २२नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली.
डॉ.हरिश रावलिया गट, ॲड.सुभाष जौंजाळे गट आणि इतर अनेक भारतीय बौद्ध महासभेचे कार्यरत गटांना एकत्रितरित्या कामकाज करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.यामध्ये एकत्रित कामकाज करण्यासाठी एकच कार्यकारिणी केंद्रीय शिक्षक आयु.अशोक भालेराव तालुका महाबळेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आली.
जिल्हा सरचिटणीस पदी आयु.यशपाल बनसोडे, कोषाध्यक्ष पदी आयु.रुपेश सावंत, संस्कार उपाध्यक्ष आयु.वामण गायकवाड, पर्यटन उपाध्यक्ष पदी आयु. यशवंत बनसोडे तर जिल्हा हिशोब तपासणीस म्हणून आयु. नंदकुमार काळे याची निवड करण्यात आली. उर्वरीत पदाधिकारी हे जिल्हा कार्रकारीणीमध्ये एकविचाराने, सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांना समाविष्ट करणेबाबत आदेश देण्यात आले.
नवनियुक्त जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांना मान्यवरानी शुभेच्छा दिल्या.




