क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-पहेलगाम हिंदूंवरील हल्याचा साताऱ्यात हिंदुत्ववाद्यांनीच केला निषेध ….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पहेलगाम हिंदूंवरील हल्याचा साताऱ्यात हिंदुत्ववाद्यांनीच केला निषेध ….
सातारा दि:
पृथ्वीवरील स्वर्ग अशी गणना झालेल्या जम्मू काश्मीर येथील पहेलगाम भागामध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करून त्यांना ठार मारले आहे . याचा साताऱ्यातील सकल हिंदू समाजाने निषेध केला. केंद्र व राज्यात सत्ता असूनही हिंदूंवर हल्ल्याचा साताऱ्यातील हिंदुत्ववादी संघटनेला निषेध करावा लागतो. याबाबत आता सर्वांनीच आत्मचिंतन करावे. अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर राज्यातील पहेलगाम येथील काही पर्यटकांची नावे आणि धर्म विचारून निघृण हत्या केली आहे. कोणत्याही मानवाची हत्या ही निषेधार्थच आहे. आज केंद्रात व राज्यात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी समर्थकांची सत्ता असूनही ही हत्या रोखू शकली नाही. हे सर्वच राजकीय पक्षाचे अपयश आहे. परंतु कोणीही याबाबत केंद्रातील गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला नाही किंवा त्यांना त्याबाबत जबाबदार धरले नाही. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
मुस्लिम राष्ट्र असलेल्या सौदी अरब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्याच्या वेळीच पहेलगाम पर्यटन स्थळी पर्यटनासाठी गेलेल्या हिंदूंची गोळ्या घालून अतिरेक्यांनी हत्या करणे. ही घटना खेदजनक आहे. काश्मीरमधील अतिरेकी नष्ट करणे. हे अद्यापही केंद्र सरकारला जमले नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता काही संघटनेने केलेली आहे. जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा झेंडा फडकवला. शांतता प्रस्थापित केली. याचे श्रेय घेतले जाते. मग, अतिरेक्यांच्या गोळीबाराबाबत केंद्र सरकारने जबाबदारी का स्वीकारली नाही? असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे.
. राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव मान्य करणाऱ्या संविधानाला हा धक्का आहे. अशा शब्दांमध्ये अनेक पर्यटकांनी तीव्र निषेध केला आहे. वास्तविक पाहता पर्यटन वाढीसाठी जम्मू-काश्मीरला येणाऱ्या हिंदू पर्यटकांवर हल्ला झाल्यामुळे तेथील स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होणार असल्याने स्थानिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवावा. अन्यथा पर्यटन बंद झाल्यास त्यांचे उपासमारी होईल. याची त्यांनी जाणीव ठेवावी. असा या निमित्त संदेश देण्यात आलेला आहे.
दरम्यान, सकल हिंदू समाजाने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निषेधच्या घोषणा देत सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देऊन सर्व अतिरेक्यांना कडक कारवाईनुसार त्यांना फाशी द्यावी किंवा एन्काऊंटर करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंद आफळे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, रविराज गायकवाड, विश्व हिंदू परिषदेचे विजय गाढवे, सचिन वाळवेकर, सुरेंद्र बोरकर, विश्वास सावरकर, डॉ समीर सोहनी, श्रीधर कुलकर्णी, विजय फडके, अपर्णा नातू , विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, रवींद्र पवार, किशोर गोडबोले, किशोर पंडित, राहुल शिवनामे, प्रवीण शहाणे, अँड .विनीत पाटील, अविनाश खर्शीकर, वैशाली टंगसाळे, रीना भणगे , आशा पंडित, अमित भिसे ,यशोवर्धन मुतालिक ,कांतीलाल कांबळे, राजन चाफेकर, डॉ सचिन साळुंखे, प्रिया नाईक, आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




