महाबळेश्वर:-महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद संचलित गिरिस्थान आर्टस् अँन्ड कॉमर्स कॉलेज मध्ये 14 सप्टेंबर हिंदी – दिन मोठ्या उत्साहात साजरा.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष
महाबळेश्वर : महाविद्यालयात हिंदी दिन उत्सहात साजरा.
महाळेश्वर गिरिस्थान नगर परिषद संचलित गिरिस्थान आर्टस् अँन्ड कॉमर्स कॉलेज मध्ये 14 सप्टेंबर हिंदी – दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. सुधाकर शिंदे,सदस्य,हिंदी अभ्यास मंडळ, महाराष्ट्र राज्य हे कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. महाविदयालयाचे माजी.विद्यार्थी किरण दळवी, दिग्दर्शक, लेखक,अभिनेता यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम सी.आर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख व्याख्याते प्रा. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की हिंदी केवळ साहित्यापूर्ती मर्यादीत भाषा नसून वेगवेगळया क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारी भाषा आहे असे सांगितले. हिंदी समाचार संपादक, शिक्षक, साहित्यिक, जाहीरात लेखन, पत्रकारिता,गीतकार, पटकथाकार, संवाद लेखन, हिंदी अनुवादक, प्रूफ रीडर, डबिंग, हिंदी अधिकारी,हिंदी निवेदक व दुभाषिया या प्रकारच्या अनेक संधी प्राप्त करून विद्यार्थी आपले करियर घडवू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. कदम सी. आर यांनी आंतराष्ट्रीय स्तरावरील हिंदीच्या प्रचार व प्रसाराचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. बाजीराव शेलार व आभार डॉ. शैलजा गवळी यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रा. संतोष आखाडे, प्रा. शब्बीर नालबंद, डॉ. रणदिवे, प्रा. लहाने, प्रा. रफीक मुल्ला, प्रा. संतोष शेडगे, प्रा. भागेश खरात व हिंदी विभागाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.