कराड:-मा.श्री. इंद्रजीत देशमुख साहेब यांचे वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कामचे आयोजन.
प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
मा.श्री. इंद्रजीत देशमुख साहेब यांचे वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कामचे आयोजन.
काकाजींच्या वाढदिनी मायेचा ओलावा….
ज्यांच्या वाणीतून महाराष्ट्रातील तरुणाईला उर्जा मिळाली, अनेकांना दिशा गवसली, व्यसनात अडकलेले कितीतरी लोक व्यसनमुक्त झाले, असे आपल्याला देवासमान असणाऱ्या आदरणीय इंद्रजीत देशमुख काकाजींचा 19 ऑक्टोबर 2022 रोजी जन्मदिवस आहे. काकाजींना प्रसिध्दी, प्रतिष्ठा, मान, सन्मान आवडत नाही. मात्र विधायक कामावर त्यांचा भर असतो. त्यामुळे काकाजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घारेवाडीच्या शिवम्ं प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी 16 ऑक्टोबर 2022 रोजी मायेच्या ओलाव्याचा कार्यक्रम कराडच्या सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आयोजीत करण्यात आला आहे. प्रतिष्ठानमार्फत हॉस्पीटलमधील अॅडमीट असणाऱ्या 100 रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यासाठी कराड रोटरी क्लबकडे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कराड व सातारा येथील मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनाही शालोपयोगी वस्तू भेट देण्यात येणार आहेत. या सामाजीक बांधीलकीच्या उपक्रमासाठी आपण वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे रविवारी सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे,ही विनंती शिवम् प्रतिष्ठान घारेवाडी यांचे वतीने करण्यात आली.