आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात दुसरी फकीरा अर्पण परिषद आज शुक्रवारी दुपारी संपन्न होणार…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात दुसरी फकीरा अर्पण परिषद आज शुक्रवारी दुपारी संपन्न होणार…

सातारा दि: डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, सातारा आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरीच्या लोकप्रियता व वाचकांच्या मनाला भिडणाऱ्या दुसरी फकीरा अर्पण परिषद साताऱ्यात शुक्रवार दि: १ मार्च २०२४ रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल प्रीती एक्झिक्यूटिव्ह सातारा राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी होत आहे. अशी माहिती ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी सातारा येथे वसंत भोजनालय मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. डोमेकटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे सर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या हस्ते उद्घाघाटन होणार असून या ऐतिहासिक कार्यक्रमाला महिला आघाडी प्रमुख सरिता ताई आवळे, क्रांती थिएटर्सचे अध्यक्ष व सातारचे माजी नगरसेवक अमर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अमोल इंगळे, सातारा शहराध्यक्ष अविनाश तुपे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गावकूसा बाहेर माणुसकी जपणाऱ्या एका नायकाचे चित्रीकरण केले होते. ती कादंबरी म्हणजे फकीरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फकीरा कादंबरी अर्पण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित, पददलित, शोषित, कष्टकरी माणसाला व त्याच्या जिद्दीला सलाम केला आहे.
सातारा या क्रांती भूमीमध्ये दुसरी फकीरा अर्पण परिषद साजरी होत असून सातारा जिल्ह्यातील फुले- शाहू आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय काम करणाऱ्या कवी- लेखक- साहित्य कार्यकर्ते व परिवर्तनवादी विचाराच्या सर्वांनी या दुसऱ्या फकीरा अर्पण परिषदेला उपस्थित राहून वैचारिक देवाण-घेवाण करावी .असे आवाहन करण्यात आलेले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर लहुजी वस्ताद साळवे, मुक्ताताई साळवे यांनी आपल्या क्रांतीतून तुतारी फुंकली आहे. तर काहींनी अंधारात चाचपडणाऱ्या लोकांना प्रकाशित करण्यासाठी हाती मशाल घेतलेली आहे. अशा सर्वच कार्यकर्त्यांनी या परिषदेला सामील व्हावे व ही परिषद यशस्वी करून दाखवावी. असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.
———————————————–

 

फोटो -दुसऱ्या फकीरा अर्पण परिषदेची माहिती देताना पदाधिकारी (छाया- निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button