क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचे मैदान कोण मारणार?

प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:- 9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचे मैदान कोण मारणार?

दोन गटात डाव प्रतिडाव सुरुच.
कुस्ती शौकीनांची उत्सुकता शिगेला.

सौरभ चव्हाण-9503995968

65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनासाठी दोन गटात सुरू असलेल्या डाव प्रतिडावामुळे यजमान पदाच्या लढतीत चुरस निर्माण झाली आहे. शह काटशहाच्या राजकारणामुळे कुस्ती शौकीनांच्या मध्ये स्पर्धेच्या ठिकाणा बद्दल ट्विस्ट वाढले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचे मैदान कोण मारणार याबाबत कुस्ती शौकीनांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करून परिषदेचा कारभार पाहण्यासाठी अस्थायी समितीची स्थापना केली आहे. कुस्ती महासंघाच्या कारवाई बाबत तत्कालीन परिषदेच्या कार्यकारणी सदस्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले होते. अस्थाई समितीच्या माध्यमातून एका गटाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाची घोषणा केली होती. अस्थाई समितीने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याच्या तयारीला वेग आला असतानाच.
न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनासाठी आखाड्यात उडी घेतली आहे.पुण्यात झालेल्या कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी बैठकीत अहमदनगरला स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. मुंबईत गुरुवारी 8 डिसेंबर रोजी परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि कार्यकारणी सदस्य यांच्या उपस्थितीआ स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करून आ. संग्राम जगताप यांना स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र देण्यात आले होते.

कुस्तीगीर परिषदेने स्पर्धा आयोजनात आघाडी घेतली असताना आज कुस्ती संघटनेतील एका गटाने थेट दिल्लीच्या आखाड्यात उडी घेतली. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिज भूषण सिंह यांची भेट घेतली. अस्थाई समितीचे माध्यमातून पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे खा. ब्रिज भूषण यांनी जाहीर केले. तसेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना आयोजनाचे पत्र देखील दिले आहे. अस्थाई समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे या दोन्ही गटात स्पर्धा आयोजनाबाबत कुस्ती सुरू आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा ही राज्यातील अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते दोन्ही गटांनी स्पर्धा आयोजनाबाबत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. स्पर्धा आयोजनासाठी आखाड्यात नाट्यमय घडामोडी होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचे मैदान नेमका कोणता गट मारणार याबाबत कुस्ती शौकीनांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे.

चौकट

पैलवानांचे नुकसान नको.

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला मोठा इतिहास आहे. मात्र अलिकडे संघटनेतील गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे. स्पर्धा आयोजनासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली असून आयोजनाचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. मल्लांनी कोणत्या स्पर्धेत खेळायचे याबाबत संभ्रमावस्था आहे. वर्चस्ववादाच्या लढाईत मल्लांचे नुकसान होऊ नये. दोन्ही गटांनी तुटेपर्यंत न ताणता कुस्ती क्षेत्राच्या भल्यासाठी मार्ग काढावा अशी चर्चा कुस्तीक्षेत्रात सुरू आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button