आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-वडूज नगरीत त्रिवेणी संगमाने वर्दीचे स्वप्न केले युवतीने साकार.

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

वडूज नगरीत त्रिवेणी संगमाने वर्दीचे स्वप्न केले युवतीने साकार.

वडूज दि: माणसाच्या अंगी जिद्द असेल व नातेवाईक , गुरुजनांचा आशीर्वाद लाभला की, पाहिलेले स्वप्न साकार होऊ शकते. याचे ज्वलंत उदाहरण खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये पाहण्यास मिळाले. कुमारी प्रिया पावडे या युवतीने पोलीस दलात खडतर परिश्रम करून प्रवेश मिळवला आहे .याबद्दल तिचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत माहिती अशी की, गरिबीचे चटके सहन करीत उदरनिर्वाहासाठी नांदेड येथून भटकंती करत वडूज नगरीत आलेल्या पावडे कुटुंबीयांनी मोलमजुरी केली. अनेक कष्टमय मेहनत घेतली तसेच वाहन चालक म्हणूनही काम केले. हे सर्व करत असताना त्यांना अनेक दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. २०१४ साली प्रियाची आईला विजेचा झटका लागून दुःखद निधन झाले. तर भाऊ प्रमोद याचा अचानकपणाने अपघात होऊन कायमस्वरूपी त्याचा एक पाय काढावा लागला.
या दुःखद प्रसंगाला सामोरे जात असताना आपले अश्रू डोळ्यात साठवून देवदूताप्रमाणे त्यांची विवाहित बहीण वर्षा व भाऊजी रुस्तमराव बेंडे यांनी आपल्या भाकरीतील अर्धी भाकरी ही प्रिया, धुराजी, प्रमोद व वडील पंजाबराव यांना दिली. पंजाबराव हे काबड कष्ट करत होते परंतु त्यांच्या संसाराला फारसा त्याला हातभार लागत नव्हता. मुलं मोठी होतील. कर्तबगार होतील .असं स्वप्न त्यांनी पाहिले. आर्थिक संकटामुळे त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आले नाही परंतु जिद्दीच्या जोरावर त्यांच्या मुलीने पोलीस दलात भरती होऊन स्वप्न पूर्ण केले. हे पण दिवस जातील हे सिद्ध करून दाखवले आहे. माणसाच्या गुणवत्ता असेल तर त्याला चारी बाजूने मदत व सहकार्य मिळते .
वडूज नगरीतील हुतात्मा हायस्कूलच्या शिक्षिका बी. एस. माने मॅडम तसेच जय मल्हार भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे प्रा. बनाजी पाटोळे सर यांनीही प्रियाच्या गरिबीची जाण ठेवून तिला विनाशुल्क जय मल्हार पोलीस भरतीपूर्व अकॅडमी मध्ये प्रवेश दिला. अत्यंत कष्टमय व परिश्रम करत प्रियाने पोलीस भरतीचा प्रयत्न सुरू केला पण अवघ्या दोन गुणांनी तिचे स्वप्न बंगले पुन्हा फिनिक्स पक्षासारखे ती उभी राहिली. फक्त समोर दिसत होते ती फक्त वर्दी. त्यामुळे तिने जिद्दीने पुन्हा अभ्यास केला. शारीरिक क्षमता वाढवली आणि आज ती पोलीस भरतीसाठी सज्ज झालेली आहे. पुणे या ठिकाणी आता पुढील प्रशिक्षण पूर्ण करून ती समाजाच्या रक्षणासाठी उभी राहणार आहे. तिच्या या जिद्दीबद्दल जय मल्हार अकॅडमीचे बनाजी पाटोळे भाजपचे नगरसेवक ओंकार चव्हाण खटाव तालुका पत्रकार परिषदेचे सचिव नितीन राऊत व अजित जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पोलीस दलातील यशस्वी झालेले प्रिया पंजाबराव पावडे येथे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तिची भाची कुमारी वेदिका सुद्धा कराटे चॅम्पियन असून तिलाही भविष्यात खूप मोठी मजल मारण्यासाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या वेळेला ऋषिकेश पडळकर, उत्तमराव म्हस्के, सौ वर्षा भेंडे व आधी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रिया पावडे हिला छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील शिक्षण संस्था उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी खूप मोलाचे सहकार्य केले
——————————————————

चौकट —- मुक्काम पोस्ट पुयणी.ता.जि नांदेड २०१४ साली विजेचा शॉक लागून आई वारली नंतर सर्व भाऊ- बहीण वडिलांना वडूज येथे २०१६ ला आणले होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button