आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निफाड:- तुकोबारायांचे वैकुंठ गमन सोहळा.

पत्रकार रोहिदास वाघ निफाड:-9623631738

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार रोहिदास वाघ निफाड

निफाड:- तुकोबारायांचे वैकुंठ गमन सोहळा.( भरवस फाटा) तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे नियोजन बैठक उत्साहात**** संत तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांनी वैकुंठ गमन केले त्यास २०२४~२५ दरम्यान३७५ वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्ताने ( भरवस फाटा) तालुका निफाड जिल्हा नाशिक दिनांक २ एप्रिल ते८ एप्रिल हा उत्सव सोहळा होणार आहे या उत्सवाची नियोजन बैठक नुकतीच भरवस फाटा येथील जेके प्राईड हॉल येथे ज्ञानेश्वर माऊली कदम( छोटे माऊली) यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली या सोहळ्याच्या बैठकीस जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षी होणाऱ्या सोहळ्यास निफाड येवला चांदवड कोपरगाव सिन्नर या तालुक्यातील नामवंत कीर्तनकार भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा अंदाज आहे तसेच या सोहळ्यात हरिनाम सप्ताह तुकोबारायांचे जीवन चरित्र कथा तसेच पारायण सोहळा होणार आहे या सोहळ्यास तुकोबारायांचे वंशज यांची उपस्थिती वंदनीय आहे या सोहळ्याची सुरुवात श्री क्षेत्र देहू येथून पायी ज्योत आणण्याचे नियोजन आहे तसेच तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणून या तालुक्यातून भ्रमण करून आठ दिवस कार्यक्रमास्थळी भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तसेच या सोहळ्यासाठी आद्य शंकराचार्य स्थापित च्या धर्मपिठातील जगद्गुरुंना ही निमंत्रण देण्यात येणार आहे तसेच या कालावधीत संपन्न होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रत्येकी तालुक्यातील एक आदर्श कीर्तनकार धन्य तुकोबा समर्थ हा पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने तुकोबारायांचे वंशज यांच्या हस्ते देण्यात येणार आहे तसेच ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे या सोहळ्यास लाखो संख्येने भाविक उपस्थित राहतील या सोहळ्याच्या बैठकीस ज्ञानेश्वर महाराज शिंदे तुकाराम महाराज पळसुळकर समाधान महाराज पगार ज्ञानेश्वर महाराज मधुकर महाराज गडाख ज्ञानेश्वर महाराज ठाकरे श्याम महाराज गाडे निलेश महाराज निकम सयाजी महाराज बोंबले रामदास महाराज जाधव बाळनाथ महाराज देवडे संतोष महाराज पोटे ऋषिकेश महाराज कुयठे दत्तू काका राऊत विठ्ठल आण्णा शेलार हरिश्चंद्र भवर शिवाजी जगताप माणिक महाराज शेळके गोरख आबा पवार संपत डोमसे सोपान गायकर निवृत्ती भाऊ जगताप माधव भाऊ जगताप शरद भाऊ भडांगे जनार्दन गीते यांच्यासह मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक उपस्थित होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button