सांगलीमध्ये राज्यस्तरीय दिशा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 दिमाखदार सोहळा संपन्न.
पत्रकार योगेश माने कराड तालुका सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सांगलीमध्ये राज्यस्तरीय दिशा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 दिमाखदार सोहळा संपन्न.
सांगली:- दिशा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व दिशा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिशा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कामगार मंत्री व विद्यमान आमदार मा. सुरेशभाऊ खाडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगलीचे विद्यमान खासदार मा. विशाल दादा पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी सुमनवहिनी खाडे (महिला सबलीकरण), नितिन बानुगडे- पाटील (इतिहास अभ्यास), मा. डॉ.कैलाश पाटील (सामाजिक),पोलीस निरीक्षक मा. दिपक भांडवलकर(पोलीस सेवा), मा. तुषार खांडेकर (सामाजिक),मा.डॉ. प्रकाश पाटील (संशोधन),मा.सदानंद कबाडगे (सामाजिक), मा.विवेक शितोळे (संशोधन व क्रीडा), मा. उत्तम गंगधर (शैक्षणिक), मा. सूर्यकांत तवटे (शैक्षणिक), मा. जितेंद्र चौगुले (सामाजिक),मा.प्रा.अविनाश लावणीस (संशोधन), मा. अमित दोरकर (सामाजिक), मा. भावेश बेलोसे (सामाजिक), मा. अर्चना पवार (उद्योग), मा. संतोष वाघमोडे (आधुनिक शेती), मा. सारिका पाटील (आरोग्य), मा. उदय माळकर (उद्योग), मा. स्वाती पाटील (शैक्षणिक), मा. आदिनाथ चौगुले (उद्योग), मा. डॉ. जिनेश्वर यलीगौडा (वैद्यकीय),मा.इलियास पिरजादे (सामाजिक), मा. बाळासाहेब धडस (शेती), मा. राजेंद्र शिवकाळे (सामाजिक), मा. रश्मिता बागेवाडी (उद्योग) मा. विशाल पाटील (आधुनिक शेती), डॉ.सुवर्णा मोरे (संशोधन), मा. सिद्धार्थ भंडारे (पोलीस सेवा), मा. प्रांत मोरे (सामाजिक), व मा. सचिन लोकापुरे (संशोधन) अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी दिशा फाउंडेशनने दिलेल्या पुरस्काराबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मा. डॉ. कैलास पाटील, संचालक,आयडियल कन्सल्टन्सी यांनी विविध योजना व प्रकल्प याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. तसेच विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे, त्याची प्रक्रिया या संदर्भात पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सुरेश भाऊ खाडे यांनी दिशा फाउंडेशन करत असलेल्या निरपेक्ष सेवावृत्तीचा गौरव केला. तसेच दिशा फाउंडेशन राबवत असलेल्या विविध उपक्रमांना मदत करण्याचे आश्वासन दिले. या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विशाल दादा पाटील यांनी ही दिशा फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. संस्थेने अतिशय देखण्या सोहळ्याच्या आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्तींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मा. स्वातीताई खाडे, सीईओ एमटीडीटी स्कूल, मा. काकासाहेब धामणे, माजी उपसभापती पंचायत समिती मिरज, मा. अण्णासाहेब कोरे, मिरज काँग्रेस अध्यक्ष, मा. डॉ. कैलास पाटील, सांगली, API, दिलीप भांडवलकर हे मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष मा.अभिजीत कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका अस्मिता खटावकर यांनी केले. हा पुरस्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी दिशा फाउंडेशनचे उपाध्यक्ष मा. प्रा.प्रशांत भंडारे, खजिनदार मा. सागर मिणचे, मा. भीमराव आठवले व दिशा फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.