फलटण:-राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ऍड. डॉ. ए. के. शिंदे यांना वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मुधोजी महाविद्यालयात सन्मान..
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ऍड. डॉ. ए. के. शिंदे यांना वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मुधोजी महाविद्यालयात सन्मान..
फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मुधोजी महाविद्यालय फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी ऍड. डॉ. अशोक कृष्णा शिंदे यांना महाराष्ट्र शासन वन विभाग सातारा परिक्षेत्र चा वन्यजीव संवर्धन व निसर्ग संवर्धना मध्ये करीत असलेल्या ईश्वरीय कार्याबाबत वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कार दिनांक 21 मार्च, 2025 रोजी जागतिक वन दिवसा निमित्त ‘वन वनवा परिसंवाद’ व ‘पुरस्कार वितरण’ कार्यक्रम फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात पार पडला सातारच्या उपवनसंरक्षक भा.व.से. मा. श्रीमती आदिती भारद्वाज यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.
या निमित्त मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रो.(डॉ.) पी.एच. कदम, अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाचे समन्वयक प्रो. (डॉ.) टी. पी. शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) प्रभाकर पवार, कला शाखा प्रमुख प्रो. डॉ. ए. एन. शिंदे व तर इतर विभागाचे विभाग प्रमुख यांनी एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी ऍड. (डॉ.) ए. के. शिंदे आणि प्रा. एस. एम. लवांडे कमिटी सदस्य डॉ. मठपती वाय. आर. , प्रा.ललित वेळेकर, प्रा. अक्षय अहिवळे प्रा.किरण सोनवलकर, डॉ. अभिजीत धुलगुडे, डॉ. जगताप डी.एम. , प्रा. रेश्मा निकम व एन.एस.एस. विभागाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचे अभिनंदन केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर व सोसायटीचे सर्व पदाधिकारी प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, प्राध्यापक सी.डी.सी. मेंबर सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.