वाई:- नगरपरिषद वाईच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार.
पत्रकार नित्यानंद मोरे वाईट शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नित्यानंद मोरे वाईट शहर प्रतिनिधी
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:- नगरपरिषद वाईच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार.
वाई नगरपरिषदेच्या हद्दीतील सनगर आळी येथील घोडके वाडा या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची अत्यंत खराब दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले असताना देखील या ठिकाणी वाई नगरपरिषदेचे आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी शौचालयाचे दरवाजे तुटून मोडकळीला आलेले आहेत. शौचालयाच्या टाक्या ही फुटलेले आहेत. पाण्याच्या टाकीची ही अत्यंत खराब अवस्था झालेली आहे. शौचालयाच्या बाजूने संपूर्ण घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे या ठिकाणी घाणीमुळे दुर्गंधी ही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. शौचालयाला जाताना लहान मोठ्यांना अक्षरशः नाकावर हात ठेवून ये जा करावी लागते शौचालयाचा वापरही लहान मोठ्यां नागरिकांपासुन मोठ्या प्रमाणात होत असतो.यामुळे येथील लहान मोठ्यांच्या आरोग्या बाबत गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे. याबाबत वाई नगर परिषदेच्या कार्यालयात तोंडी तसेच लेखी स्वरूपात तक्रारी देऊनही याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. वाई नगरपरिषद वाईच्या आरोग्यविभागा कडून दखल घेतली जात नाही.यामुळे वाई नगरपरिषद वाईच्या हद्दीतील सनगर आळी घोडके वाडा येथील रहिवासी स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहेत. वाई नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे स्थानिक नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांकडून बोलले जात आहे. वाई नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन यासंदर्भात उपायोजना करून लोकांच्या आरोग्याचा धोका टाळावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.