कोरेगाव:-पिंपोडे बुद्रुक येथे तब्बल 23 वर्षानंतर वर्गमित्र मैत्रिणीनी मारल्या मनमुराद गप्पा ,शाळेतील आठवणींनी काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर काहींची डोळे पाणवले.
पत्रकार अभिजीत लेंडे सातारा:-9822883516

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अभिजीत लेंडे सातारा
तब्बल 23 वर्षानंतर वर्गमित्र मैत्रिणीनी मारल्या मनमुराद गप्पा ,शाळेतील आठवणींनी काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर काहींची डोळे पाणवले.
शाळेच्या विकास कामासाठी ४०हजार रोख रक्कम व ग्रंथालयासाठी ७५ पुस्तके देण्यात आले.
पिपोडे बुद्रुक
शाळेच्या वाटेवर धावायचे आहे पुन्हा निरागस अशा स्वप्नात रमायचे आहे, शाळेचे ते रंगीबेरंगी आयुष्य जगावेसे वाटते पुन्हा, शाळेला भेटण्याची अशी ओढ मनी बाळगून येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे बुद्रूक ता.कोरेगांव जि.सातारा १९९९-२००० बॅचेच्या विद्यार्थ्यांनी 23 वर्षानी एकत्र येऊन हसत खेळत शालेय, जीवनातील खट्याळ आठवणींना उजाळा देत, मित्र मैत्रीणींना साद घालत घेतलेला शिक्षक विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.
पिंपोडे बुद्रूक येथील यशवंतराव चव्हाण विदयालयासमोर समोर रांगोळी काढून दुतर्फी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी पुष्पवूष्टी करून केले स्वागत पाहून शिक्षक अक्षरशा: भारावून गेले. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक दगडे सर होते. शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
विदयार्थ्यांनी खुमासदार शैलीत परिचय करुन दिला. देशाचे रक्षण करणारे सैनिक व पोलीस दलातील अधिकारी यावेळी यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर लोखंडे सर, भोज सर , चव्हाण सर, मोहोटकर मॅडम, पी. एस. आय, जालिंद्र लेंभे , तुषार महांगडे, सुरेखा साळुंखे, आरती जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन प्रमोद पवार, व सारिका नावडकर यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी अजित महाजन, ,सुभेदार लेंभे, अमोल लेंभे, विदया लेंभे, रेशमा सावंत, “निलेश लेंभे , प्रशांत गार्डी संदीप निकम यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
. विद्यार्थ्यांची वाचनाची आवड वृद्धिगंत व्हावी या
हेतूने विदयालयाच्या ग्रंथालयासाठी ७५ पुस्तके देण्यात आली आणि शाळेच्या विकासनिधी साठी 40 हजार रोख स्वरुपात देणगी देण्यात आली.