दापोडी:-रिक्षामध्ये अश्लिल चाळे करताना हटकल्याच्या कारणावरून दापोडी येथे रिक्षाचालकाचा खून.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
रिक्षामध्ये अश्लिल चाळे करताना हटकल्याच्या
कारणावरून दापोडी येथे रिक्षाचालकाचा खून
दापोडी, दि. 20 (शफिक शेख) :- ऑटो रिक्षामध्ये प्रेयसीसोबत अश्लिल चाळे करीत बसलेल्या युवकास हटकल्याने त्या रिक्षाचालकाचा डोक्यात, छातीत आणि पोटावर सिमेंट वीटाने मारून मारून खून करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर खूनप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये केस क्रमांक 236/203, भारतीय दंड विधान कलम 302, 324, 323, 504, 506 (2), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 3 आणि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. भवारी करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी अमित बाळासाहेब कांबळे, वय 26 रा. महात्मा फुलेनगर, दापोडी, पुणे हा एका तरूणीसोबत गणपती मंदिर, गणेश गार्डन फेज 3 दापोडी येथे लावलेल्या रिक्षा क्रमांक एम एच. 14 जे पी 1408 यामध्ये अश्लिल चाळे करीत बसला होता. काही वेळाने त्या रिक्षाचा मालक आणि फिर्यादीचा भाउ मयत अलीम उर्फ अली इस्माईल शेख, वय 42, रा. श्रीकृष्ण मंदिरामागे, जवळकरनगर, पिंपळे गुरव, पुणे हा त्याची रिक्षा घेण्यासाठी आला आता त्याने त्याच्या रिक्षात अशाप्रकारचे अश्लिल चाळे करताना अमित यांस हटकले. त्यामुळे रागात येवून ‘‘अभी तेरा गेम ही बजा डालता हूं’’, असे सांगत आरोपी याने मयत अली यांस रस्त्यावरील सीमेंट वीटांनी मारण्यासा सुरूवात केली. मयत अलीच्या डोक्यात, छातीत आणि पोटावर जोरजोरात वीटांनी मारहाण केल्याने त्या मारहाणीत मयत रिक्षाचालक अली याला ठार मारण्यात आले.
याबाबत भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. रवि भवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर खुनामध्ये आरोपी आणि मयत यांच्यामध्ये पूर्वी कोणतीही ओळख किंवा भांडण नव्हते केवळ अश्लिल चाळे का करता असा जाब विचारल्याने आरोपीने चिडून जावून मयत अली शेख याचा खून केला. आरोपीस आज दिनांक 20 मार्च 2023 रोजी न्यायालयात हजर केले जाणार असून त्यात पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचे श्री. भवारी यांनी सांगितले.