मुंबई:-एकता क्रांती दल संघटनेच्या मागणीची दखल घेऊन अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल!!! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
एकता क्रांती दल संघटनेच्या मागणीची दखल घेऊन अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल!!! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

मुंबई:- पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकणासह मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेतजमीन पाण्यात बुडाल्या आहेत. यामुळे पिके, फळबागा नष्ट झाली, काही ठिकाणी जमीन खरपूस झाली, तर अनेक जनावरे आणि काही लोकांचा जीवही गेला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी बुधवारी नुकसान पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांचा दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि आश्वासन दिले की, सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल.
दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी ई मेल व्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पहाणी निरिक्षण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आथिर्क मदत दिली जाईल असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिवाळी पुर्वी देण्यासाठी घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी स्वागत केले असून महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे संततधार पावसामुळे पिकांचे संपुर्ण नुकसान झाले असून महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खास बाब म्हणून नैसर्गिक संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरसकटपणे विनाअट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी व त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी वित्त व नियोजन विभागाला निर्देश देऊन दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई दिली तरच शेतकऱ्यांना पुढील हंगामात मशागत लागवड पेरणी करण्यासाठी दिलासा मिळेल अशी अपेक्षा अनिलकुमार कदम यांनी व्यक्त केली आहे.




