पिंपरी चिंचवड :- चिंचवड मधील कायनेटिक कंपनी समोर मोठ्या प्रमाणात पडलेल्या कचऱ्यामुळे आग लागण्याची शक्यता.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-976727 5783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
पिंपरी चिंचवड :- चिंचवड मधील कायनेटिक कंपनी समोर मोठ्या प्रमाणात पडलेल्या कचऱ्यामुळे आग लागण्याची शक्यता.
पुणे, चिंचवड, दि. 22 (शफिक शेख):- चिंचवडमधील कायनेटिक कंपनीसमोर वजन काटयाजवळ एक मोठा विद्युत डीपी आहे. आणि त्याच्या अगदी खाली मोठया प्रमाणात निकामी फ्लेक्स, पेपर्स, झाडाच्या सुकलेल्या फांद्या आणि कचरा पडलेला आहे.
सदर डीपीमध्ये वारंवार शॉर्टसर्किट होत असतात जर यामधून एकही ठिणगी या कच-यावर पडली तर मोठया प्रमाणात आग लागून आजूबाजूच्या कंपन्यांनाही आग लागून मोठया प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होवू शकते.
मागील अनेक दिवसांपासून हा कचरा पडलेला असून याची संबंधितांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. या प्रकाराची माहिती संबंधित कचरा उचलणा-या ठेकेदारास दिली असता त्यांनी उद्या रोजी जेसीबी आणून सदर पूर्ण कचरा साफ करण्याचे आश्वासन दिले आहे. आता केवळ त्यांच्या आश्वासनावरच येथील नागरिकांची आणि कंपन्यांचे जीवन अवलंबून आहे.