आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महिला दिन होणार साजरा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महिला दिन होणार साजरा.

सातारा दि: प्राथमिक शिक्षकांना अडचणीला आर्थिक मदत व्हावी. या हेतूने प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रचली आहे. आज त्याचा वटवृक्ष झाला असून दिनांक ८ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्व शाखेमध्ये ८ ते १६ मार्च या कालावधीमध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये स्थानिक संचालक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने महिला दिन साजरा होत आहे. तसेच शताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अशी माहिती सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन किरण यादव व वाईस चेअरमन शिवाजी खाडे यांनी दिलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील नावलौकिक प्राप्त केलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची स्थापना २१ ऑक्टोबर १९२४ रोजी झालेली आहे १७ एप्रिल१९४८ रोजी संस्थेची विभागणी उत्तर व दक्षिण सातारा होऊन सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुका वगळता उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये तेरा शाखांमधून प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कार्यरत आहे.
सदर बँकेने यशस्वी मार्गक्रमण केलेले आहे. बँकेचे १० हजार २६८ ठेवी सभासद आहेत बँकेचे ठेवी ७०० कोटी असून ४४३ कोटी रुपये कर्ज वितरण केलेले आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय ११४ कोटी असून प्रति सेवक व्यवसाय ७ कोटी ४४ लाख इतका आहे.
बँकेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो तसेच सभासदांच्या हिताचाही निर्णय घेतला जातात .सभासदांना वाहन तारण, शैक्षणिक व घर बांधणी, आपत्ती निवारण ओ.डी. सोने तारण, अल्पमुदत व दीर्घ मुदत कर्ज देण्यात येत असते.
भविष्यात यू.पी.आय. ए.टी.एम. सुधारणा करण्याचा मानस प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा आहे. प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेमध्ये महिला सभासदांची संख्या ३५३१ एवढी असून २१ कार्यक्षम संचालकांपैकी दोन महिला संचालक आहेत. अशी ही माहिती चेअरमन यादव व्हाईस चेअरमन खाडे यांनी दिलेले आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे व सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद एका दिल्याने व एकोप्याने काम करत आहेत. भविष्यात प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नूतन वास्तूची उभारणी करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा शताब्दी महोत्सव पूर्ण होईपर्यंत वरिष्ठ नेतेगण मंडळी व सभासदांचे सहकार्य लाभत आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त बँकेने प्रगती केलेली आहे. यासाठी सर्व सभासदांचे सहकार्य मिळाले आहे. त्या सर्वांचे त्यांनी आभार मानून सर्व महिला सभासदांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. ===========================================
फोटो -प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन किरण यादव

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button