गंगापूर:-अधिवेशन संपण्यापूर्वी जोगेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावास मान्यता देऊ.. आरोग्य मंत्री मा.ना.तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
अधिवेशन संपण्यापूर्वी जोगेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावास मान्यता देऊ..
आरोग्य मंत्री मा.ना.तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा
गंगापुर ता.3 प्रतिनिधी
गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्यासंदर्भात आज मी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.
जोगेश्वरी परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विशेष बाब म्हणून जोगेश्वरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी आरोग्य संचालनालय यांनी निकषात बसणारा परिपूर्ण सुधारित प्रस्ताव 12 मार्च 2024 रोजी शासनाकडे सादर केला असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र शासनस्तरावर यासंदर्भात अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसून जोगेश्वरी परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी-सुविधा लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी सदरील प्रस्तावास तात्काळ मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी सभागृहात केली.
माझ्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना.तानाजी सावंत यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी जोगेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावास मान्यता देऊ असे सभागृहात सांगितले.