पुसेसावळी – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल आनंद मेळावे फायद्याचे – गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पुसेसावळी – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल आनंद मेळावे फायद्याचे – गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते.
प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना विकसित करण्याचे एक मोठे व्यासपीठ म्हणजे बालआनंद मेळावे होय. बौद्धिक विकासाबरोबर सामाजिक भावनिक शारीरिक आणि मानसिक विकास साधून एक सक्षम पिढी निर्माण करण्याचे सामर्थ्य हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून घडविण्याचे कामं सातत्याने चालू आहे. कळंबी केंद्रातील शाळांनी जिल्हापातळीवर क्रीडा स्पर्धा, यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धामधून यश प्राप्त केले आहे त्याच बरोबर विद्यार्थ्यांमध्ये सभाधिट पणा, वक्तृत्वाचा विकास समयसूचकता, यांचाही विकास करण्यासाठी बाल आनंद मेळाव्यातून प्रयत्न चालू आहेत. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संगीता जाधव, चंद्रकांत सुतार केंद्र प्रमुख धनाजी पवार उपस्थित होते. या बाल आनंद मेळाव्यातून घोड खिंडीतील लढाई, शेतकरी गीत, छ. शिवरायांचे बाल पण ते राज्याभिषेक,व्हीक्ट्री सॉन्ग,स्त्री जिवनाची कथा, माऊली,रिमिक्स डान्स,खंडोबा जागरण,सोशल माध्यमाचा दुष्परिणाम, देश भक्तीपर गीते, लावणी, अशा एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रमांनी मेळावा अतिशय सुरेख संपन्न झाला या बाल आनंद मेळाव्यास तालुक्यातून वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी, केंद्रातर्गत गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. केंद्र प्रमुख धनाजी पवार यांनी आभार मानले…..