क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिल्लोड:-शिवना येथून भर दुपारी मोटारसायकल वरून शेळी चोरून नेताना दोघांना ग्रामस्थांनी पकडले-अजिंठा. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

शिवना येथून भर दुपारी मोटारसायकल वरून शेळी चोरून नेताना दोघांना ग्रामस्थांनी पकडले.

अजिंठा. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील ग्रामपंचायत कार्यालया जवळ असलेल्या शेड मधून शेळी चोरून मोटारसायकल वर घेऊन जात असताना शेळी मालकाने आरडा ओरड केली असता दोघांना ग्रामस्थांनी पकडुन पोलिसांच्या स्वाधिन केल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शेळीसह मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली असून दोघांना अटक केली आहे.
याबाबत अजिठा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
शिवना ( ता .सिल्लोड )येथील शेख जाहीर शेख अब्दुल्ला या शेतकऱ्याचे जनावरांसाठीचे पत्र्याचे शेड ग्रामपंचायत कार्यालय जवळ आहे.ते सकाळी शेळ्याना पाणी पाजण्यासाठी शेडा जवळ आले असता त्यांना तोंड झाकलेले दोघे इसम सुमारे ९ हजार रुपये किंमतीची ३ वर्षाची एक शेळी मोटारसायकल वर घेऊन जाताना दिसताच त्यांनी आरडा ओरड केली असता त्यांना शिवाई मंदिर जवळ ग्रामस्थांनी अडविले असता दोघे ही शिवना येथीलच गजानन प्रल्हाद मानकर,सुरेश पुंडलिक मानकर दिसले.त्यांनी दोघांना अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन केले असता अजिंठा पोलिसांनी दोघा विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून एक शेळी व मोटारसायकल हस्तगत करून त्यांना अटक केली आहे.याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शना खाली बिटजमादार अरुण गाडेकर,दिलीप तडवी करीत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button