गंगापूर:-(देऱ्हळ)- गोकुळ अष्टमी उत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण सोहळा.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
आज दिनांक 22/08/24 रोजी वर्ष २२ वे गोकुळ अष्टमी उत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण सोहळा.
गोकुळाष्टमी उत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा व सात दिवसाचे नामांकित महाराजांचे कीर्तन सोहळा तसेच यांची दुसऱ्या दिवसाची किर्तन सेवा श्री. ह.भ.प. सागर महाराज भेंडे. भोकरदन जालना कदम. आपल्या वाणी मधून अखंड हरिनाम सप्ताह मध्ये जमलेल्या समुदायास साधू संतांची व आई-वडिलांची सेवा करा व गोमातांची सेवा करा हे महाराजांच्या वाणी मधून आलेल्या जनतेस संदेश दिला तसेच राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ या जन्माला आल्या नसतात छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते असे महाराजांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र विषयी महाराजांनी अनेक विषयावर महाराजांनी आपल्या वाणी मधून मांडण्याचा प्रयत्न केला आणि भारत माता ची सेवा करणारे सीमेवर लढणारे जवान त्यांच्या कार्य कसा आहे हे महाराजांनी आपल्या वाणी मधून सांगितले आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य घडवले नसते ताज गावागावांमध्ये मंदिर नसते कारण महाराजांसोबत लढणारे मावळेच कट्टर मावळे होते महाराजांच्या आजूबाजूला देखील कोणाची हिम्मत होत नव्हती तसेच महाराजांनी आई-वडिलांची सेवा करा यातच सर्व काही पुण्य आहे असे महाराजांनी सांगितले तरुणांना महाराजांनी दारू व्यसन करू नका त्याच्यामध्ये आपले जिंदगी बरबाद होती आहे असे सांगितले दारूपासून अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले असे महाराजांनी आपल्या वाणी मधून सांगितले यावेळेस दुपारच्या अन्नदाते वाल्मीक भाऊसाहेब सोमासे सायंकाळच्या अन्नदाते श्री प्रकाश पंढरीनाथ सोमासे . नानासाहेब अण्णासाहेब सोमासे. ज्ञानेश्वर विनायक सोमासे. कैलास शेषराव सोमासे. योगेश उत्तम सोमासे.चंद्रकांत शिवाजी सोमासे. भावलाल काशिनाथ कुऱ्हाडे यांनी पूर्ण गावाला अन्नदान केले आहे गावातील व आजूबाजूला परिसरामध्ये आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.