कराड:-टेंभू अत्याचार प्रकरणी अखेर पोलिसांची कारवाई.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
टेंभू अत्याचार प्रकरणी अखेर पोलिसांची कारवाई.
कराड दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात अनेक घटना पत्रकार उघडकीस आणतात. त्यानंतर पोलीस कारवाई होते. काहींवर राजकीय दबाव पोटी कारवाई सुद्धा होत नसल्याची तक्रार पुढे आलेली आहे. टेंभू ( कराड )या ठिकाणी आश्रम शाळेतील प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून महिलांसह दोघांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, अनाथ आश्रमाच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करून देहविक्री करण्यास भाग पाडले जाते. अशी माहिती मिळाल्यानंतर काही पत्रकारांनी याबाबत फिर्यादी महिलेची बाजू मांडून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर पीडित महिलेने माहिती दिली की, लोणंद परिसरात राहणारी असून चार वर्षांपासून ती अत्याचार सहन करत आहे. त्यानंतर पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळेला एक वृद्ध महिला तिच्या नातीसह राहत असल्याचे समोर आले. त्या ठिकाणी तपास सुरू केला व वृद्ध महिलेच्या नातीला शासकीय संस्थेस पाठवले आहे. अशी माहिती दिलेली आहे. वास्तविक पाहता अनाथ आश्रम शाळा व इतर निवासी शाळेची तपासणी करण्याची जबाबदारी ही महिला- बालकल्याण विभाग तसेच समाज कल्याण व शिक्षण विभागाची आहे. त्यांची तपासणी का केली नाही? हा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत आता कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले आहे.