मायणी येथे स्फूर्ती शिक्षण संस्थेमार्फत लवकरच उच्च माध्यमिक वर्ग सुरु करणार – माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर
प्रतिनिधी खलील मुलाणी खटाव:-8600942800

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मायणी येथे स्फूर्ती शिक्षण संस्थेमार्फत लवकरच उच्च माध्यमिक वर्ग सुरु करणार – माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर येथे स्फूर्ती शिक्षण संस्थेचे उच्च माध्यमिकचे वर्ग सुरु करुन विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय दूर करणार असे उदगार खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी सन २०२३ मध्ये एस.एस.सी.परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमातच अध्यक्ष पदावरुन बोलताना काढले. प्रमुख पाहुणे म्हणून किरण जाधव यावेळी उपस्थित होते. डॉ.येळगावकर म्हणाले,आपल्या संस्थेत इयत्ता पहिली मध्ये येणारा विद्यार्थी शिक्षण पूर्ण करुनच नोकरीसाठी बाहेर पडेल. प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण याच संस्थेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत.त्यामुळे पदवी नंतरच निरोप समारंभ होईल.आता एस.एस.सी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊया. असे सांगून त्यांनी अंकुशराव रजपूत,पांडुरंग झगडे,डॉ.सुशांत देशमुख,झाकीर हुसेन नदाफ,नितीन पडळकर यांची संस्थेच्या संचालकपदी निवड केली. माजी उपसरपंच आनंदराव शेवाळे यांची यशोदिप सोसायटीच्या संचालकपदी निवड केली. प्रमुख पाहुणे पदावरुन बोलताना किरण जाधव म्हणाले,विद्यार्थ्याने वरातीतील घोडा किंवा शर्यतीतील घोडा न बनता युध्दातील घोडा बनले पाहिजे.युद्ध जिंकण्यासाठी युध्दातील घोडा प्राणाची बाजी लावून घोडेस्वार पळवेल तसा पळतो.पण तो थांबत नाही. युध्दातील घोड्याचा आदर्श विद्यार्थांनी घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी संस्थापक – सचिव पांडुरंग तारळेकर,कार्याध्यक्ष राजाराम कचरे,डॉ.सुशांत देशमुख,झाकीर हुसेन नदाफ यांनी तसेच अजिंक्य अवघडे,शुभांगी यलमर,रितेश पवार यांनीही मनोगत व्य वाक्त केले. याचदिवशी सकाळी अकरा वाजता स्फूर्ती शिक्षण संस्थेमधील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन व विविध गुण दर्शन पार पडले.कार्यक्रमासाठी डॉ.सौ.उर्मिला येळगावकर,सौ.पल्लवी गुदगे,मुख्याध्यापक दिपक खलीपे,चेअरमन मोहनराव दगडे,डॉ. अमोद चोथे, जालिंदर माळी,कुमार देशमुख तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बरकत शेख व आभार प्रा.दिलीप पुस्तके यांनी मानले.