खटाव:-पुसेसावळी येथे विजेच्या तारांना फांद्याचा विळखा. संबंधित विभागाचे दुर्लक्ष.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पुसेसावळी येथे विजेच्या तारांना फांद्याचा विळखा.
संबंधित विभागाचे दुर्लक्ष.
पुसेसावळी ता.खटाव येथील लक्ष्मीनगर ला जाणाऱ्या रस्त्यालगत विद्युत पुरवठा करणार्या महावितरणच्या तारांना झाडांच्या फांद्यांचा विळखा पडला आहे.त्यामुळे पाऊस व वारा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संबधीत विभागाकडून मात्र कोणतीच दखल घेतली जात नाही.संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची या रोडवर सारखी ये-जा असते मात्र त्यांच्याकडून वारंवार दुर्लक्ष होताना दिसते.वादळामुळे या तारांमध्ये फांद्या अडकून त्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा तसेच घरालगत असल्याने परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. धोकादायक स्थितीत विजेच्या खांबांना विळखा घातलेल्या फांद्या तोडण्याची मागणी होत आहे.विद्युत ताराही झाडांच्या विळख्यात सापडल्या आहेत. वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर तो झाडांच्या फांद्यातून व वेलीतून खाली उतरू शकतो. शहरातील अनेक भागातील खांब हे रस्त्यालगत व लोकवस्तीत असल्यामुळे चुकून एखाद्याचा हात लागला किंवा वीजप्रवाह ओल्या झालेल्या जमिनीवर लांबवर पसरत गेला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.तसेच शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे धोकादायक स्थितीत विजेच्या खांबांना विळखा घातलेल्या फांद्या तोडण्याची मागणी ही परीसरातील नागरीकां कडून केली जात आहे.