जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून रुपेश जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारी पदभार स्वीकारला.
प्रतिनिधी:- आशीतोष चव्हाण महाराष्ट्र :-8208717483

दि. 23 : रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारीपदाचा पूर्व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. पूर्व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. जयवंशी यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र व राज्य शासनाने त्यांना गौरविले आहे. कोरोना काळात सिंह यांनी जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रुचेस जयवंशी यांची कालच साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. जयवंशी हे काल साताऱ्यात दाखल झाले. आज त्यांनी शेखर सिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला जयवंशी हे 2009 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी महिला व बालकल्याण आयुक्तपदी ही काम केले आहे. तसेच हिंगोली जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा केली आहे.